Aurangabad: औरंगाबादमध्ये हातबॉम्ब आढळल्याने खळबळ, पण चौकशीअंती बॉम्ब स्फोटकजन्य नसल्याचे स्पष्ट
Aurangabad : घटनास्थळाला एटीएसच्या पथकानेदेखील भेट देऊन नेमका हा हातबॉम्ब आला कसा याची चौकशी केली.
Aurangabad News: औरंगाबादच्या फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील श्यामवाडी शिवारातील एका शेतात हातबॉम्ब (Hand Grenade) आढळल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, बॉम्ब शोधक पथकाने केलेल्या तपासणीत या बॉम्बमध्ये स्फोटक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांची भीती दूर झाली.दरम्यान, घटनास्थळाला एटीएसच्या पथकानेदेखील भेट देऊन नेमका हा हातबॉम्ब आला कसा याची चौकशी केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्यामवाडी (ता. औरंगाबाद) येथील गोपालसिंग घुनावत यांचे शेत आहे. शनिवारी त्यांच्या शेतात काही मुले खेळताना माती, दगड उकरत होती. यावेळी त्यांना खेळतांना बॉम्बसारखी वस्तू दिसून आली. पण ही वस्तू नेमकी काय आहे, याबाबत माहित नसल्याने मुलांनी याची माहिती गोपाल घुनावत यांना दिली. घुनावत यांनी पाहणी केल्यानंतर सदरील वस्तू ही बॉम्बसदृश असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सुरवातीला तातडीने मुलांना बाजूला करत दुसऱ्या ठिकाणी पाठवले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील मानसिंग राजपूत आणि फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र नकाळजे यांना कळविली.
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलांना आढळून आलेल्या वस्तूची पोलिसांनी पाहणी केली असता तो जुना डॅण्डग्रेनेड (हातबॉम्ब) असल्याचे आढळून आले. त्यामुळे याची माहिती पोलिसांनी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला देऊन पाचारण करण्यात आले. या पथकाने बॉम्बची तपासणी केली असता सदरील बॉम्ब स्फोटकजन्य नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हा बॉम्ब पूर्णपणे गंजलेला असल्याने तो, निजामकालीन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गावात एकच खळबळ...
श्यामवाडी येथे मुलांना शेतात खेळतांना आढळून आलेली वस्तू, हातबॉम्ब असल्याची माहिती काही क्षणात गावात पसरली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. त्यात गावात पोलीस, बॉम्बशोधक पथक आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पण तपासाअंती बॉम्ब स्फोटकजन्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र तोपर्यंत गावकऱ्यांची मात्र धकधक वाढली होती.
मोठी दुर्घटना टळली...
श्यामवाडी येथे शेतात काही मुलं खेळत असताना त्यांना जमिनीत त्यांना एक वस्तू आदळून आली. त्यामुळे त्यांनी याची माहिती तिथे असलेल्या जमीन मालकाल दिली. मात्र तो हातबॉम्ब होता. पण सुदैवाने स्फोटकजन्य नव्हता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अन्यथा तो मुलांच्या जीवतास धोका निर्माण झाला असता.
Aurangabad: पुन्हा जलवाहिनी फुटली, औरंगाबादकरांना 15 तास उशिराने पाणी येणार