एक्स्प्लोर

Aurangabad Metro: औरंगाबाद शहरातील पहिल्या मेट्रोचा डीपीआर तयार; 6800 कोटींचा खर्च अपेक्षित

Aurangabad: सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर या डीपीआरचे सादरीकरण केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Aurangabad Metro Update: मुंबई, पुणेच्या धर्तीवर औरंगाबादेतही मेट्रो रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या दिवसांपासून केली जात आहे.  दरम्यान आता औरंगाबाद शहरातील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार झाला आहे. महामेट्रो कंपनीने वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी मार्गावरील डीपीआरचे काम पूर्ण केले आहे. सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर या डीपीआरचे सादरीकरण केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या मेट्रो रेल्वे मार्गासाठी एकूण 6  हजार 800  कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

औरंगाबाद शहरातील वाढती लोकसंख्या आणि जालना रोडवरील होणारी वाहतूक कोंडी पाहता, शेंद्रा ते वाळूज एमआयडीसी असा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिलमध्ये केली होती. त्यामुळे याच प्रकल्पात साडेआठ किमी अंतराचा डबल डेकर उड्डाणपूल उभारून त्यावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले होते. तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतलेल्या पुढाकाराने अखेर औरंगाबाद शहरातील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार झाला आहे. ज्यात या मार्गावरील अखंड उणपुलासाठी 3  हजार 600  कोटी आणि त्यावर मेट्रो रेल्वेसाठी 3  हजार 200 कोटी असा एकूण 6  हजार 800  कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

वाळूज एमआयडीसी आणि डीएमआयसी एकेमकांना जोडणार...

वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी असा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल तयार झाल्यास याचा मोठा फायदा उद्योजकांना होणार आहे. कारण जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी समजल्या जाणारे वाळूज शहर आणि शेंद्रा एमआयडीसीसोबतच नव्याने तयार होत असलेल्या डीएमआयसीचा प्रवास सोपा होणार आहे. त्यामुळे दोन्ही महत्वाच्या एमआयडीसी एकेमकांना जोडल्या जातील. यामुळे उद्योजकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. सोबतच मेट्रो रेल्वेचा देखील प्रवाशांना फायदा होईल. 

शहरातील विकासात भर... 

आशिया खंडात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. त्यामुळे शहरात मेट्रो रेल्वे सुरु झाल्यास यामुळे विकासात भर पडणार आहे. वाळूज ते शेंद्रा असा मोठा अंतर मेट्रोमुळे काही मिनटात पार करता येईल. तर नव्याने विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीपर्यंतचा प्रवास देखील सोपा होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराला वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी असा नव्याने होणारा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल आणि मेट्रो नवीन ओळख देणारी ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
Embed widget