OBC Reservation: ओबीसी आरक्षणाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो: धनंजय मुंडे
OBC Political Reservation Maharashtra : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे, त्याचं मी आणि आमचा पक्ष स्वागत करत असल्याच मुंडे म्हणाले आहे.
OBC Political Reservation Maharashtra : ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावाणी दरम्यान बांठिया अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणूका व्हायला हव्यात असे कोर्टाने म्हंटले आहे. सोबतच जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती देता येणार नाही, असेही कोर्टानं स्पष्ट केलेय. तर कोर्टाच्या याच निकालानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे.
न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलतांना मुंडे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात जो बांठिया आयोग नेमला गेला होता. तसेच न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे ट्रिपल टेस्ट बाबत जे काही निर्णय घेण्यात आले त्याचा अहवाल न्यायालयाने स्वीकारले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे, त्याचं मी आणि आमचा पक्ष स्वागत करत असल्याच मुंडे म्हणाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या बाजूने निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 20, 2022
महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारशी लागू करून ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा व्हावा व ( 1/2)
तसेच आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नाहीत ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेतली होती. तसेच आरक्षण मिळाले नाहीत तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे, त्याठिकाणी 27 टक्के ओबीसी उमेदवार दिले जाणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र न्यायालयाने सर्वसामान्य ओबीसी माणसाची भूमिका आयकून जो निर्णय दिला आहे, त्याबद्दल आभार मानतो, असे मुंडे म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या...
OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता, महायुती सरकारने शब्द पाळला : देवेंद्र फडणवीस