Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 जुलैला मराठवाड्यात; औरंगाबाद जिल्ह्याचा करणार दौरा
Abdul Sattar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 जुलैला औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
Abdul Sattar: मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे 31 जुलैला औरंगाबाद येथे येणार असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे जिल्ह्याभराचा दौराही करणार असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले आहे.
मुंबई येथे माध्यमांना माहिती देतांना अब्दुल सत्तार म्हणाले आहे की, 31 जुलैला मुख्यमंत्री माझ्या सिल्लोड मतदारसंघात येणार आहे. सोबतच आमच्या जिल्ह्याचा सुद्धा ते दौरा करणार असल्याचे सत्तार म्हणाले. लाखो लोकं एकनाथ शिंदे यांची वाट पाहत आहे. त्यामुळे मराठवाड्यात आमचा एकही आमदार पडणार नाही अशी ग्वाही आम्ही देतो असेही सत्तार म्हणाले.
आदित्य ठाकरेंवर टीका...
दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा करत, शिवसंवाद यात्रा काढली होती. यावर बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, आदित्य ठाकरे हे माझ्या मतदारसंघात आलेच नाही. ते आले नाही म्हणून त्यांना विशेष निमंत्रण आहे की, पुढच्यावेळी तरी या माझ्या गद्दाराच्या मतदारसंघात, असेही सत्तार म्हणाले.
सर्वाधिक बंडखोर आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील...
एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या आमदारांपैकी सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले संदिपान भुमरे आणि राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदा सोडून शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान याच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली होती आणि यावेळी मोठी गर्दीही झाली होती. त्यामुळे मतदारसंघात संभ्रम असून, ते दूर करण्यासाठी आणि शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकनाथ शिंदे या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Eknath shinde : धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य