![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aurangabad News : पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू; पैठण खुल्या कारागृहातील घटना
Aurangabad News: ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
![Aurangabad News : पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू; पैठण खुल्या कारागृहातील घटना maharashtra News Aurangabad Crime News Death of a prisoner serving life sentence in the case of wifes murder Paithan Open Jail incident Aurangabad News : पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू; पैठण खुल्या कारागृहातील घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/19/5a3ce3bda2f098fdb3fe4f5ff32c366b1674100467899443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News : औरंगाबादच्या पैठण (Paithan) खुल्या कारागृहातील एका कैद्याचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर येत आहे. कारागृहात पत्नीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा भोगणाऱ्या एका बंदिस्त कैद्याचा आजारपणाने ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. दिलीप नरसिंग सोनवणे (वय 52 वर्षे, रा. वसमत) असे मयत कैद्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील दिलीप नरसिंग सोनवणे याने आपल्याच पत्नीचा खून केला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी त्याला अटक करुन, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान न्यायालयाने अंतिम निकाल देताना दिलीप सोनवणे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे नरसिंग सोनवणे हा हर्सूल येथील कारागृहात त्यांच्या पत्नीच्या खून प्रकरणात 22 जुलै 2019 पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
चांगल्या वर्तनामुळे पाठवले खुल्या कारागृहात
हर्सूल कारागृहात शिक्षा भोगताना त्याच्या चांगल्या वर्तनामुळे हसूल कारागृहातून त्याला मे 2020 ला पैठणच्या खुल्या कारागृहात पाठवले होते. तर कोरोनाकाळात दोन वर्षे तो पॅरोलवर सुटला होता. मात्र पुन्हा पैठण कारागृहात आल्यानंतर तो काही महिन्यांपासून सतत आजारी पडत होता. वैद्यकीय तपासणीत त्याला असह्य आजार जडल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्याच्यावर कारागृहात उपचार करण्यात येत होते. मात्र 16 जानेवारी रोजी सकाळी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कैदी दिलीप सोनवणे यांचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांकडून घटनेची दखल
कैदी दिलीप सोनवणे यांचा मृत्यूची घटनेची माहिती मिळताच पैठणच्या सहाय्यक न्यायाधीश अपर्णा रोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि प्रल्हाद मुंडे, नायब तहसीलदार गिरजा शंकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी प्रेत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची पैठण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आजारी!
नरसिंग सोनवणे याला न्यायालयाने त्याच्या पत्नीच्या हत्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान हर्सूल कारागृहात त्याचे चांगल्या वागणुकीची दखल घेऊन, त्याला पैठणच्या खुल्या कारागृहात पाठवण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो सतत आजारी पडत होता. तर त्याला असह्य आजार जडल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्याच्यावर कारागृहातच उपचार करण्यात येत होते. संबंधित प्रशासनाकडून देखील त्याची काळजी घेतली जात होती. मात्र अखेर त्याचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच सोबतच्य इतर कैद्यांनी हळहळ व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)