रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे
मुंबई : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी ही नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यावेळी प्रथमच विभागवार महिला अध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे.
विद्या चव्हाण यांनी राष्ट्र सेवादल यांच्यासोबत काम करण्यास मंडल आयोगानंतर निघालेली रथ यात्रा आणि मंदिर - मशिद विवादानंतर सर्व सामान्यांच्या प्रश्नावर सक्रिय राजकारणात भाग घेतला होता. मृणाल गोरे, कमला देसाई, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, मधू दंडवते यांच्या सोबत जनता दलात काम सुरू केले. अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला
2000 साली संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई येथील आदिवासी व गरीब यांच्या 80 हजार झोपड्या उद्ध्वस्त करण्याची कार्यवाही करण्यात येत होती. त्या विरोधात व त्यांना न्याय मिळावा म्हणून अनेक आंदोलन करत 12 हजार झोपडपट्टी धारकांना संघर्षनगर चांदवली येथे पक्की घरे मिळवून दिली.
मुंबई हायवे रुंदीकरण प्रकल्, गोवंडी, चेंबूर ,धारावी ,पार्ले , सायन कोळीवाडा येथील एसआरए योजनांमध्ये झोपडी धारकांना हक्काची घरे मिळवून दिलीत. चैत्यभूमी वाचवण्यासाठी अनेक दलीत व मच्छीमार बंधू भगिनींना संघटित करून श्याम गायकवाड व विद्या चव्हाण यांनी चैत्यभूमी वाचवली
विद्या चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
- विद्या चव्हाण यांचा 2004 साली राष्ट्रवादीत प्रवेश
- मुंबई महानगरपालिकेत 2007 मध्ये वॉर्ड क्रमांक 36 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या
- 2010 मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या महाराष्ट्राच्या महिला प्रदेश अध्यक्ष झाल्या
- 2011 ते 2014 रोजी विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती
- 2014 ते 2020 विधान परिषद सदस्य पदी नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता विद्या चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.काही दिवसांपूर्वी विद्या चव्हाणांनी अमृता फडणवीसांचा 'डॉन्सिंग डॉल' असा उल्लेख केला होता. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या