एक्स्प्लोर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; कांदाचाळ उभारणीसाठी रोहयोअंतगर्त मिळणार 1 लाख 40 हजारांचं अनुदान

Agriculture News : रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण मंजुरीच्या निर्णयाचे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. 

Agriculture News : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर (Onion Price) घसरल्याने शेतकऱ्यांना (farmers) याचा मोठा फटका बसत आहे. अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis government) रोजगार हमी योजना विभागाने (Maharashtra Rojgar Hami Yojana) महत्वाचा निर्णय घेतला आहे. कारण कांद्याची साठवणूक करण्यासाठी गोदाम म्हणून कांदाचाळ आता रोजगार हमी योजनेंतर्गत उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी अनुदान देखील दिले जाणार आहे. रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण मंजुरीच्या निर्णयाचे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. 

राज्यातील अनेक भागात दरवर्षी मोठ्याप्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. त्यामुळे एकाचवेळी कांदा विक्रीसाठी बाजारात येत असतो. दरम्यान, आवक वाढल्याने कांद्याचे दर पडतात आणि अक्षरशः शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. विशेष म्हणजे, कांद्याच्या बाजार भावात चढ-उतार झाल्यावर कांदा साठवणूक करण्याचा कोणताही पर्याय शेतकऱ्यांकडे नसतो. त्यात कांदा काढल्यावर खराब होण्याची भीती अधिक असल्याने मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकून मोकळा होतो. 

त्यामुळे बाजारपेठेत योग्य दरात पुरवठा आणि निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणुकीची क्षमता वाढविणं गरजेचे झाले आहे. पण कांदाचाळ तयार करण्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा ठरत नाही. शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेत सरकराने कांद्याची साठवणूक करण्यासाठी गोदाम म्हणून कांदाचाळ आता रोजगार हमी योजनेंतर्गत उभारण्यास मंजुरी दिली असून, तसा शासन आदेश काढण्यात आला आहे. ज्यात 1 लाख 40 हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. 

नेमकी जशी असणार योजना...

  • रोजगार हमी योजनेंतर्गत कांदाचाळ उभारणीसाठी एकूण 4 लाख 58 हजार 730 रुपये खर्च येणार आहे.
  • त्यामध्ये 96 हजार 220 रुपये मजुरीसाठी अनुदान असणार.
  • तर साहित्यासाठी लागणारा 64 हजार 147 रुपये खर्च मिळणार आहे. 
  • मजुरी आणि साहित्याचा एकूण 1 लाख 60 हजार 367 रुपयांचा खर्च रोहयोअंतर्गत भागविण्यात येणार आहे.
  • तर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या कांदाचाळीची रुंदी 3.90 मीटर असेल आणि लांबी 12 मीटर तर उंची 2.95 मीटर इतकी असणार आहे.
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वैयक्तिक तसेच सामूहिकरीत्याही कांदाचाळ उभारता येणार आहे.
  • एवढेच नाही तर शेतीगट, महिला बचत गट हेही लाभ घेऊ शकतात.

महत्वाच्या इतर बातम्या : 

Onion Price : संभाजीनगरात कांद्याला रुपयाचा भाव, शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत महामार्ग रोखला

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, गुहकर्जदारांना दिलासा मिळाल्यास ईएमआय कमी होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Supriya Sule Dance Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचं लग्न, सुप्रिया सुळेंचा तुफान डान्स
Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा
सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे, मुरली शर्मासह कुमार शानू यांना 25 वा "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार"
Gold Rate Prediction : सोन्याचे दर पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
सोने पुन्हा उच्चांक गाठणार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय घडणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर 
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
छगन भुजबळांचं थेट रुग्णालयातून भाषण, सलाईन लावून भावनिक आवाहन; म्हणाले,तुम्ही मला 5 वेळा निवडून दिलं
Home Loan : आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीची लवकरच बैठक, रेपो रेट कमी करण्याची शक्यता, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार?
आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, गुहकर्जदारांना दिलासा मिळाल्यास ईएमआय कमी होणार
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
नवी मुंबईतून 25 डिसेंबरला विमानाचं पहिलं उड्डाण, पॅसेंजर सिम्युलेशन टेस्ट यशस्वी, शेकडो स्वयंसेवकांकडून रंगीत तालीम
Home Rent Rules : भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
भाडेकरुंसाठी केंद्राचा मोठा निर्णय, 2 महिन्यांची भाडं डिपॉझिट, वर्षातून एकदा भाडेवाढ, नवे नियम लागू 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget