'अडीच ग्रॅम सोन्याचा न्याय झाला पण तब्बल 22 वर्षांनी, उस्मानाबादच्या शकुंतलाबाईंच्या न्यायालयीन खटल्याची कथा
उस्मानाबादची शंकुतला बाई येरमाळ्याच्या यात्रेसाठी 1998 साली गेल्या होत्या. तेव्हा चोरीला गेलेले 2 ग्रॅम 500 मिली सोने 2 मार्च 2021 ला परत मिळाले. सोने चोरीला गेले तेव्हा शंकुतला बाई 40 वर्षाच्या होता आज 63 वर्षाच्या आहेत.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका विवाहितेचे चाळिशीत चोरीला गेलेले मंगळसूत्र साठीनंतर परत मिळाले आहे. या साठी या महिलेने तब्बल 22 वर्षे पाठपुरावा केला. शंकुतलाबाईंनी ऊस तोडणी करून 900 रुपयांचे अडिच ग्रॅम सोने खरेदी केले होते. पोलिसांनी चोरट्याकडून पकडलेले सोने परत घेण्यासाठी वकिलांना 500 रूपये द्यावे लागले. कित्येक फेऱ्या पोलिस स्टेशनच्या आणि न्यायायलयाच्या कराव्या लागल्या आहेत.
उस्मानाबादची शंकुतला बाई येरमाळ्याच्या यात्रेसाठी 1998 साली गेल्या होत्या. तेव्हा चोरीला गेलेले 2 ग्रॅम 500 मिली सोने 2 मार्च 2021 ला परत मिळाले. सोने चोरीला गेले तेव्हा शंकुतला बाई 40 वर्षीच्या होता आज 63 वर्षाच्या आहेत.
कळंब तालुक्यातील वाकरवाडी येथील शकुंतला विठ्ठल शिंदे या शेतकरी महिला आहेत. 1998 साली चोरी झाली तेव्हा येरमाळ्यात पोलिस चौकी होती. आज सुसज्ज पोलिस स्टेशन आहे. तत्कालीन कर्मचाऱ्यांनी वर्षभरातच गुन्ह्याचा छडा लावला होता. मंगळसूत्रासह चोरट्यांना गजाआडही केले. पुढे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मात्र तारखा अन सुनावण्या या न्यायालयीन प्रक्रियेतच हे मंगळसूत्र अडकून पडले. चोरट्याला अद्याप शिक्षा झालेली नाही. न्यायालयीन प्रक्रियेत दीर्घकाळ हे सोने नाहक अडकून बसले होते. पोलिसांनी 1998 साली झालेल्या चोरीचा तपास 2010 साली लागला होता.
13 जुलै 2019 ला शकुंतला बाईच्या अडीच ग्रॅम मंगळसुत्राचे प्रकरण न्यायालयीन सुनावणीला आले. त्यानंतर कळंब न्यायालयात लोक अदालत झाली. त्यात हे प्रकरण पटलावर आले. तेव्हा याच लोक अदालतीने फिर्यादी महिलेस मंगळसूत्र परत करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. त्यानंतर मंगळवार 2 मार्च रोजी शकुंतला शिंदे यांना त्यांच्या पतीच्या उपस्थितीत पोलिसांनी परत दिले. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शकुंतलाबाईंना वकिल फीस 500 रूपये द्यावी लागली.
मंगळसुत्राची चोरी झाली तेव्हा शकुंतला शिदे या साधारणत: चाळिशीत होत्या. आता साठी उलटून गेल्याने मंगळसूत्र घेण्यासाठी त्यांना गावातून कळंब ठाण्याला येणेही जिकिरीचे बनले होते. त्यातच लॉकडाऊन व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिंदे दाम्पत्याने ठाण्यात येणेच टाळले. कित्येक फेऱ्या पोलिस स्टेशनच्या आणि न्यायायलयाच्या कराव्या लागल्यात .ही व्यवस्था कशी काम करते याचा उत्तम नमुना आहे.