एक्स्प्लोर

Ketaki Chitale Live Update : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale)अडचणीत वाढ झाली आहे.

LIVE

Key Events
Ketaki Chitale  Live Update :  अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ

Background

Ketaki Chitale Issue :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीवर आतापर्यंत नऊ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. 

दरम्यान केतकी चितळेला आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे. त्यानंतर केतकीला दिलासा मिळतो की अडचणी वाढणार याकडं लक्ष लागलं आहे. केतकी चितळेच्या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली होती. आजही राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून केतकीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. आज केतकीला घेऊन पोलीस कोर्टात दाखल झाले आहेत. ठाणे कोर्टाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या तसेच इतर पदाधिकारी जमायला सुरुवात केली आहे. काही वेळात न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

अकोला पोलिस घेणार केतकीला ताब्यात?.  
या प्रकारानंतर अकोल्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरु यांना खदान पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर केतकी हिच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  केतकीच्या आक्षपार्ह पोस्टमुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटलं. राज्यभरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करत केतकीवर कारवाईची मागणी केली जात आहे. अकोल्यात राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केतकीच्या कृत्यावर टीका केली. तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरु यांनी खदान पोलिसांत तक्रार देत, तिच्यावर कारवाईची मागणी केली. या तक्रारीनंतर खदान पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  सद्यस्थितीत या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत, अन् याचा अधिक तपास खदानच्या हेड कॉन्स्टेबल जयश्री कुंबारे करीत असून आवश्यकता भासल्यास केतकी चितळे हिला ताब्यात घेतले जाणार, अशी माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिली.

शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं

शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं आहे.  केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं विकृती, सर्वपक्षीयांकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आक्रमक भूमfका घेण्यात आली आहे. दरम्यान केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून मी केतकीला मी ओळखत नसल्याचे पवारांनी काल म्हटलंय. सर्व स्तरांतून केतकीच्या पोस्टचा  विरोध केला जात असून राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी केतकीची चूक असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

Raj Thackeray : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले, म्हणाले...

Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन

14:46 PM (IST)  •  15 May 2022

संत तुकाराम महाराज संस्थानकडून केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

संत तुकाराम महाराज संस्थानकडून केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ. आता संत तुकाराम महाराज संस्थानने देखील केतकीवर गुन्हा दाखल करायची मागणी केलीये. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे विश्वस्तांनी तसा तक्रारी अर्ज दिलाय. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात जी कविता फेसबुकवर पोस्ट केली, त्यात 'तुका म्हणे' असा उल्लेख करण्यात आलाय. 'तुका म्हणे' या शब्दांचा उल्लेख करून, वादग्रस्त आणी विटंबनात्मक लेखन करण्यात आलंय. 'तुका म्हणे' ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून, महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. तेंव्हा कोणत्याच संताचा वापर अशा पद्धतीने केला गेला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळं पुढं अशी कोणीच चुक करू नये म्हणून केतकी चितळेवर गुन्हा दाखल करावा. असा तक्रारी अर्ज संत तुकाराम महाराज संस्थानने करत कायदेशीर कारवाईची मागणी केलीये.

12:08 PM (IST)  •  15 May 2022

नौपाडा पोलीस ठाण्यात केतकीच्या विरोधात नाही तर निखिल भामरेच्या विरोधात एफआयआर

नौपाडा पोलीस ठाण्यात केतकीच्या विरोधात नाही तर निखिल भामरेच्या विरोधात एफआयआर  

12:06 PM (IST)  •  15 May 2022

Ketaki Chitale Live Update : केतकीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल, मुंबईच्या भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

केतकीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल, मुंबईच्या भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

11:27 AM (IST)  •  15 May 2022

 Ketaki Chitale Live Update :  केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी

 Ketaki Chitale Live Update :  केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी; केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला, ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली

11:19 AM (IST)  •  15 May 2022

 Ketaki Chitale Live Update : गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर

 Ketaki Chitale Live Update : गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर,

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget