Sharad Pawar : 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर? शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar : 2024 मध्ये महाविकास आघाडी (maha vikas aghadi) एकत्र निवडणुका लढणार की नाही हे आता कसं सांगणार, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
Sharad Pawar : महाविकास आघाडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 मध्ये महाविकास आघाडी (maha vikas aghadi) एकत्र निवडणुका लढणार की नाही हे आता कसं सांगणार, असं शरद पवार म्हणालेत. अजून आमची आपसात चर्चा झाली नाही, जागावाटप कसं करायचं ते ठरलं नाही, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आता सांगू शकत नाही. एकत्र लढण्याची इच्छा आहे पण फक्त इच्छा पुरेशी नसते असंही पवारांनी म्हटलंय.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छा पुरेशी नसते, त्यामध्ये जागांचे वाटप अजून काहीचं केलं नाही. त्यामुळं त्याबाबत कसं सांगता येईल असे शरद पवार म्हणाले. तसेच वंचित आघाडीसोबत आमची कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. काल (23 एप्रिल) शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केलं. जागावाटपाची चर्चा झाली नाही. त्यामुळं त्याबाबत आत्ताच कसं बोलणार असे पवार म्हणालेत. दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार अशी चर्चा जोर धरत आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. याबाबत काँग्रेस आणि शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
Sanjay Raut : संजय राऊतांची सावरासावर
अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केलं. आगामी निवडणुका एकत्र लढणार की नाही हे आता कसं सांगणार असे पवार म्हणाले. दरम्यान, संजय राऊतांनी मात्र, याबाबत सारवासारव केली आहे. पवारांच्या मनात तसं काहीही नाही, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असल्याचा दावा राऊतांनी केला. याक्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. आमच्या मोठ्या सभा होत आहेत. 1 मे ला मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासीक सभा होत आहे. तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडी तयार करण्यात शरद पवारांचा मोठा वाटा आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींचाही वाटा आहे. शरद पवारांची पहिल्यापासून एकत्र निवडणुका लढण्याची इच्छा आहे. 2024 साली आपण भाजपचा पराभव करु ही पवारसाहेबांची भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: