Navi Mumbai : नवी मुंबईत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, नामांकित खाद्य पदार्थांचे लेबल बदलून विक्री, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Navi Mumbai : नवी मुंबईत (Navi Mumbai Crime) नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Navi Mumbai : नवी मुंबईत (Navi Mumbai Crime) नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा प्रकार समोर आला. तुर्भे औद्योगिक वसाहतीमध्ये (Tubhe MIDC) नामांकित खाद्य पदार्थांचे लेबल बदलून विक्री करण्यात येत होती. या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासना कडून कारवाई करण्यात आली आहे.
नामांकित खाद्य पदार्थांचे लेबल बदलून विक्री
तुर्भे औद्योगिक वसाहतीमध्ये नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि थंडपेय साठवून यावरील माहितीची लेबल बदलवली जात होती. या संपूर्ण कारभाराबाबत शंका असल्याने अन्न व औषध प्रशासनाला याची तक्रार करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाने या गोदामांची झाडाझडती घेतल्यावर अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी पंचवीस लाख रुपये किंमतीची उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केला आहे.
उत्पादन तारीख, एक्सपायरी तारीख बदलून पुन्हा विक्री
इथल्या औद्योगिक वसाहतीत वेफर्स, कुरकुरे, थंड पेय याचा साठा करून ठेवण्यात आला होता. रसायन वापरून खाद्य पदार्थावरील उत्पादन तारीख, एक्सपायरी तारीख बदलून पुन्हा विक्री केली जात होती. यासंदर्भात मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी थेट अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना तक्रार करून गोदामांची तपासणी करण्यासाठी मागणी केली होती.
बिनधास्तपणे सुरू होता प्रकार, तब्बल 10 तास गोदामाची तपासणी
तुर्भे येथील औद्योगिक वसाहतीत धक्कादाय प्रकार घडला आहे. नामांकित कंपनीचे खाद्य पदार्थ तसेच थंडपेय साठवून यावरील एक्सपायरी तारीख नवीन लेबल लावून बदलली जात असल्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू होता. एक्सपायरी तारखेनंतर देखील नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि थंडपेय विक्री करता यावी; यासाठी रसायन वापरून उत्पादन तारीख बदलून साठ्यातील उत्पादनांची छापील माहिती नवीन लेबल लावून बदलून याची विक्री करण्यात येत होती. मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी छापा टाकत तब्बल 10 तास गोदामाची तपासणी केली.