केंद्र निधी देत नाही म्हणणाऱ्या राज्य सरकारची निष्क्रियता; राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी पडून
काँग्रेस सरकारच्या तुलनेत मोदी सरकारकडून राज्याला अडीच पट जास्त निधी देण्यात आला आहे.
मुंबई : ओला दुष्काळ, पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून फारशी मदत होत नाही. कारण केंद्र सरकार निधी देत नाही अशी ओरड महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत असतात. परंतु केंद्र सरकारने दिलेला राष्ट्रीय आपत्ती निवारणचा निधी राज्य सरकारने अद्याप पूर्ण खर्च केला नसल्याची बाब समोर आली आहे. या बाबतची कागदपत्र एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.
आकडेवारीवर नजर टाकली तर मोदी सरकारने काँग्रेसच्या तुलनेत राज्य सरकारला जास्त निधी दिल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. काँग्रेस सरकारच्या तुलनेत मोदी सरकारकडून राज्याला अडीच पट जास्त निधी देण्यात आला आहे.
काय आहे वास्तव?
- 2021/ 22 यावर्षात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ मधून 4 हजार 352 कोटी रुपयांचा निधी मिळाला.
- पण महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत 3 हजार 634 कोटी रुपये निधी खर्च केला
- म्हणजे अद्याप 718 कोटी रुपये राज्य सरकारने निधी खर्च केलेला नाही
- काँग्रेसच्या काळात म्हणजे 2010 ते 2014 या पाच वर्षात केंद्र सरकारकडं 7582 कोटी रुपये मिळाले होते.
- तर 2015 ते 2019 या पाच वर्षात 17 हजार 532 कोटी रुपये केंद्राकडून मिळाले आहेत.
- म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळापेक्षा मोदी सरकारच्या काळात अडीच पट जास्त निधी केंद्राकडून मिळाला आहे.
परतीच्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं सावट पसरले. उन्हाळ्यातील दुष्काळ, त्यानंतर आलेला महापूर आणि पूर ओसरल्यानंतर परतीच्या पावसामुळे उद्भवलेली अतिवृष्टी यामुळे यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने जिल्ह्यातील द्राक्षबागांना याचा मोठा फटका बसला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
Shivsena : राष्ट्रवादी तुपाशी, शिवसेना उपाशी! निधी वाटपात राष्ट्रवादीची आघाडी तर शिवसेना पिछाडीवर
Political Fund : या वर्षी राजकीय पक्षांना 1100 कोटी रुपयांचा फंड, भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 611 कोटी रुपये