Raj Thackeray : राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर, तीन महिन्यात दुसऱ्यांदा नागपुरात येत असल्यानं चर्चांना उधाण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज नागपूर (Nagpur) दैऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.
![Raj Thackeray : राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर, तीन महिन्यात दुसऱ्यांदा नागपुरात येत असल्यानं चर्चांना उधाण Maharashtra Nagpur News MNS Raj Thackeray Nagpur visit today Raj Thackeray : राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर, तीन महिन्यात दुसऱ्यांदा नागपुरात येत असल्यानं चर्चांना उधाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/01130542/RAJ-THACKERAY-PC-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज नागपूर (Nagpur) दैऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर तेथील प्रश्न काय आहेत, ते सोडवण्यासाठी काय करता येईल याबाबत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देखील देण्यात येणार आहेत.
नागपुरात हिवाळी अधिवेशन, राज ठाकरे कोणाला भेटणार का?
दरम्यान, सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Assembly Winter session 2022) सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळं नागपुरात राज ठाकरे कोणाला भेटणार का? याबाबतची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात राज ठाकरे यांनी नागपूर दौरा केला होता. तेव्हा त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं. तेव्हा त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तसेच एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यामुळं आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.
तीन महिन्यात दुसऱ्यांचा राज ठाकरे नागपूरमध्ये
राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात दौरे करत आहेत. पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांसी ते संवाद साधत आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता त्या पार्श्वभूमीवर पक्षबांदणीसाठी राज ठाकरेंचा दौरा असल्याचेही बोलले जात आहे. तीन महिन्यात दुसऱ्यांदा राज ठाकरे नागपूरमध्ये येत असल्यानं त्यांच्या या दौऱ्याला महत्व आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
'पक्ष बांधणीच्या आड कुणी आला तर त्याला तुडवा अन् पुढे व्हा, मी वकिलांची फौज उभी करतो' : राज ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)