Maharashtra Nagarpanchayat Election LIVE Updates : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Nagarpanchayat Election LIVE Updates : OBC आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर आज मतदान. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23, पंचायत समितीच्या 45 जागांसाठीही मतदान.
LIVE
Background
Maharashtra Nagarpanchayat Election : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही आज मतदान होत आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान आज होतं आहे. तसेच, उद्या (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
105 नगरपंचायतीपैकी पालघर-तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक- पेठ, सुरगाणा, नंदुरबार-धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, यवतमाळ-झरी-जाणणी, गडचिरोली-मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीपैकी माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी आज मतदान होणार आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे 106 नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या जागा खुल्या गटात समजल्या जाणार आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर 27 टक्के जागा या खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्या होत्या. 21 डिसेबंरला झालेल्या 11 नगरपंचायतीच्या निवडणुका आणि आज होणाऱ्या निवडणुका यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे, 19 जानेवारीला होणार आहे. मतदानाला सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु झालं असून आणि संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान असेल.
डॉक्टर अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी निवड
डॉक्टर अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे. 4 फेब्रुवारीपासून ते पदभार स्वीकारणार आहेत.
अकोले नगरपंचायतीच्या निवडणूकीत सरासरी 80.52 टक्के मतदान
अकोले नगरपंचायतीच्या निवडणूकीत सरासरी 80.52 टक्के मतदान झाले आहे. चार जागांसाठी हे मतदान पार पडले आहे.
रायगड जिल्ह्यातील नगरपंचयत निवडणुकीत 78.09 टक्के मतदान...
रायगड जिल्ह्यातील नगरपंचयत निवडणुकीत 78.09 टक्के मतदान झालं आहे. यावेळी पोलादपूर येथे सर्वाधिक 86.28 तर पाली येथे 85.87 टक्के मतदान झालं आहे. आज जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीत मतदान झाले.
जिल्ह्यातील ६ नगरपचांयत मध्ये २१ जागांसाठी मतदान...
पाली 85.87%
खालापुर 76.49%
तळा 75.26%
म्हसळा 69.49%
पोलादपुर 86.27%
माणगाव 75.37%
मानोरा नगरपंचायतीमध्ये 5:30 वाजेपर्यंत 76.3 टक्के मतदान
मानोरा नगरपंचायतीमध्ये 5:30 वाजेपर्यंत 76.3 टक्के मतदान झाले आहे.
बोदवड नगर पंचायत निवडणूक : साडेतीन वाजेपर्यंत 54.76 टक्के मतदान
बोदवड नगर पंचायत निवडणूक : साडेतीन वाजेपर्यंत 54.76 टक्के मतदान झाले आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगर पंचायत साठी सकाळी 3.30 पर्यन्त 78.26% तर संग्रामपूर नगर पंचायती साठी 74.1% मतदान झाले आहे.