![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Election 2022 : भाजपचं 'मिशन महानगरपालिका'; मुंबई महानगरपालिकेची धुरा आशिष शेलारांच्या खांद्यावर
Election 2022 : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तयारीला लागला असून मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आशिष शेलार यांना देण्यात आली आहे.
![Election 2022 : भाजपचं 'मिशन महानगरपालिका'; मुंबई महानगरपालिकेची धुरा आशिष शेलारांच्या खांद्यावर Maharashtra Municipal corporation Election 2022 Ashish Shelar to win Municipal Corporation Election Election 2022 : भाजपचं 'मिशन महानगरपालिका'; मुंबई महानगरपालिकेची धुरा आशिष शेलारांच्या खांद्यावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/25/982159df98679e5aec14dfb42913a159_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका ठेपल्या आहेत. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तयारीला लागली आहे. या संदर्भात भाजपाच्या कोअर कमिटीत येणाऱ्या पालिका निवडणुकासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून मुंबई पालिका निवडणुकीसाठी आशिष शेलार यांना जबाबदारी देण्यात आली. या बैठकीत जिल्हानिहाय जबाबदारीचे वाटप भाजपा नेत्यांना देण्यात आले.
मुंबई महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार आहे. शिवसेनेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची जबाबादारी आशिष शेलार यांना देण्यात आली आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेत भाजपचे 83 नगरसेवक आहेत.
जिल्हानिहाय जबाबदारी
- ठाणे महानगरपालिका - निरंजन डावखरे
- नागपूर महागरपालिका - सुधीर मुंनगंटीवार
- उल्हासनगर पालिका - कुमार ऐलानी
- कोल्हापूर पालिका - धनंजय महाडीक
- सोलापूर पालिका - विजय देशमुख
- पुणे महानगरपालिका - राजेश पांडे
- चंद्रपूर पालिका - चंद्रशेखर बावनकुळे
- पिंपरी महानगरपालिका - माधुरी मिसाळ
- नाशिक पालिका -गिरिष महाजन
- सहप्रभारी पालिका - प्रभारी जयकुमार रावल
- औरंगाबाद पालिका - डॉ. भागवत कराड
- लातूर पालिका - संभाजी निलंगेकर
- परभणी पालिका - बबनराव लोणीकर
- लातूर पालिका - संभाजी निलंगेकर
- अकोला पालिका - रणधीर सावरकर
मुंबई महापालिकेचा कारभार नगरसेवक व प्रशासनाच्या माध्यमातून चालवण्यात येतो. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून 7 मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येत असल्याने मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचनेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली; याचिकाकर्त्यांना ठोठावला दंड
BMC Election: निवडणूकीच्या सहा महिने आधी प्रभागांची फेररचना बेकायदेशीर, हायकोर्टात नव्यानं याचिका
Municipal Corporation Election: आगामी 10 महानगरपालिकेच्या निवडणुका राज्य सरकार पुढे ढकलण्याच्या तयारीत...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)