Weather Update LIVE : राज्यभरात थंडीची लाट, धुळीचा कहर; वाचा महत्वाचं अपडेट्स
Weather Update LIVE : राज्यभरात थंडीची लाट आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान कमालीचं घटलं आहे. वाचा महत्वाचं अपडेट्स
LIVE
Background
Cold Weather : देशभरात सुरू असलेल्या थंडीचा परिणाम मुंबईतही दिसून येत आहे. राज्यभरात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचले आहे. येत्या एक ते दोन दिवस मुंबईत थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडी जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.
राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबईत 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील तीन ते चार दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात मागील 24 तासापासून पावसाचं वातावरण होतं. अशातच वातावरणात गारवा देखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय.
राज्यात विविध ठिकाणी मध्यरात्री पावसाच्या सरी, थंडीत वाढ
महाबळेश्वर, दापोली, खेड आणि चिपळूणमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. पुणे (Pune) सह महाराष्ट्रात काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे मध्यरात्री राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट, राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंद; वाचा सविस्तर
- उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे येण्याची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा अंदाज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत, धुळीच्या कणांचा प्रभाव आजही कायम
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक गंभीर श्रेणीत, धुळीच्या कणांचा प्रभाव आजही कायम, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० पार, माझगावचा एक्यूआय ६०८ तर कुलाब्यात ५४४ वर .
उत्तर भारतात पावसाची स्थिती कायम असल्याने वाऱ्यांची दिशा बदलली आणि धुळीच्या वादळाचा प्रभाव उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात दिसून येत आहे
वातावरण बदलामुळे फळधारणा होत नसलेल्या तीन एकर हरभरा पिकावर शेतकऱ्याने नांगर फिरवला.
निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी गारपीट तर अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झालाय. दरम्यान या वर्षी तरी हरभऱ्याचे पीक चांगले येईल म्हणून किनवट तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीवर शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती.परंतु या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या हरभरा पिकास फळ, फुल धारणा होत नसल्याने त्यावर नांगर फिरवण्याची वेळ आलीय. हरभरा पिकाची जोमाने वाढ होऊनही,अशा या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या झाडाला फळधारणा होत नसल्याने किनवट तालूक्यातील येंदापेंदा येथिल शिवाजी बोइनवाड या शेतकऱ्यांनी तीन एकर मधील हरभरा पिकावर नांगर फिरवलाय.
वादळी वाऱ्याने रब्बी हंगामातील गहू ज्वारी आणि मका या पिकांचे मोठे नुकसान
टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला आग, यंत्रमाग कारखान्याला आग
सातारा : महाबळेश्वरातील तापमान 6.1 अंशावर तर वेण्णालेक परिसरातील तापमान 4.7 अंशावर, सातारा 10.5 अंशावर
सातारा : महाबळेश्वरातील तापमान 6.1 अंशावर तर वेण्णालेक परिसरातील तापमान 4.7 अंशावर, सातारा 10.5 अंशावर
वाई 10.2 अंशावर