एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Weather Update LIVE : राज्यभरात थंडीची लाट, धुळीचा कहर; वाचा महत्वाचं अपडेट्स

Weather Update LIVE : राज्यभरात थंडीची लाट आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान कमालीचं घटलं आहे. वाचा महत्वाचं अपडेट्स

LIVE

Key Events
Weather Update LIVE : राज्यभरात थंडीची लाट, धुळीचा कहर; वाचा महत्वाचं अपडेट्स

Background

Maharashtra Cold Weather : महाराष्ट्रात गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. राज्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. परिणामी हवेत गारवा राहिल्याने तापमानात घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. धुळे जिल्ह्यात 4.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर, नंदुरबारसह नाशिकच्या निफाडमध्येही पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. प्रामुख्याने धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. पश्चिमी चक्रवातामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतही मोसमातील निच्चांकी 14 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. वेण्णालेक परिसरात 4.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये पारा 6.5 अंशावर पोहोचला आहे. वाईमध्ये 9 अंश तर, साताऱ्यामध्ये 11.3 अशं तापमान आहे. नाशिकच्या निफाडमध्येही पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोहोचल्याने बळीराजा समोर मोठं संकट उभं राहीलं आहे. या कडाक्याच्या थंडीचा द्राक्षांवर मोठा परिणाम होणार असून मणीना तडे जाण्यासोबतच फुगवणी थांबणार आहे. या बागा वाचविण्यासाठी बळीराजा भल्या पहाटेपासून बागांमध्ये गवत जाळत शेकोटी करून मणींना ऊब देत आहेत. तर, पुण्यामध्येही 9.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. 

परभणी जिल्ह्याचे तापमानही घसरले आहे. परभणी जिल्ह्याचे तापमान 8.6 अंशावर असून सर्वत्र थंडीचा कडाका वाढल्याचं चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये पारा पाच अंश सेल्सिअसच्या खाली नोंद झाली आहे. सपाटी भागात तापमान 8.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. दुर्गम डोंगराळ भागात सपाटी भागापेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअस पेक्षा तापमान कमी असते. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

16:23 PM (IST)  •  25 Jan 2022

पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात थंडीची लाट

पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात थंडीची लाट आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालन्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील कमाल आणि किमान तापमानात घसरण झाली आहे. 

09:59 AM (IST)  •  25 Jan 2022

परभणीचे तापमान 8.6 अंशावर, थंडीने परभणीकर गारठले

मागच्या अनेक दिवसांनंतर परभणीच्या तापमानात मोठी घट झाली असुन जिल्ह्याचे तापमान हे 8.6 अंशावर आले आहे यामुळे परभणीकर थंडीने चांगलेच गारठून गेले आहेत. हवेत गारवा वाढल्याने सर्वत्र थंडीचा कडाका वाढलाय. पुन्हा एकदा जिल्ह्यात शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे या थंडीचा फायदा गहू आणि हरभरा पिकाला 
होत आहे.

09:58 AM (IST)  •  25 Jan 2022

बुलढाण्यात वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

बुलढाणा जिल्ह्यात आज 9.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे वर्षात सर्वात कमी तापमान आहे.

09:56 AM (IST)  •  25 Jan 2022

रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरला

रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट झाली आहे. माथेरान येथे आज 10 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी 7.6 अंश तापमानाची नोंद झाली होती.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 8 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHaryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणारABP Majha Headlines : 07 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Suraj Chavan: बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
Embed widget