Maharashtra Mumbai Rains LIVE : कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली ते नांदगाव यादरम्यानची वाहतूक विस्कळीत
सद्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
LIVE
Background
Maharashtra Rain Updates LIVE : सद्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. एनेक ठिकाणी शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आज रायगड पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुलढाण्यातील कोराडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला. कोराडी प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. कोराडी प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सुरक्षिततेच्या दृष्ठीने धोक्याचा इशारा दिला आहे.गेल्या वर्षी याच प्रकल्पाच्या सांडव्यावर पिकनिक साठी आलेले चार तरुण अचानक पाणी वाढल्याने अडकले होते ज्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने आता खबरदारी घेतली आहे.
Kokan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली ते नांदगाव यादरम्यानची वाहतूक विस्कळीत
Kokan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली ते नांदगाव यादरम्याने रेल्वेची इलेक्ट्रिक तार तुटल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत. कणकवली ते नांदगावच्या मध्ये मालगाडी रुळावर थांबली असल्याने मुंबईवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दुपारी रेल्वे मार्गावरील इलेक्ट्रिक तार तुटल्याने अडीच ते तीन तास कोकण रेल्वे वाहतूक ठप्प होती. मात्र आता कोकण रेल्वे वाहतूक इलेक्ट्रिक तार जोडल्यामुळे पूर्वपदावर येत आहे
निरा खोऱ्यात दमदार पाऊस, वीर धरण 91 टक्के भरले
निरा खोऱ्यात गेली सहा दिवसापासून दमदार पाऊस बरसत असल्याने नीरा नदीवर असलेले वीर धरण हे 91 टक्के भरले आहे. धरणातून आज दुपारी दोन वाजता नीरा नदी पात्रात 4 हजार 418 क्यूसेस विसर्ग निरा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या विद्युत ग्रहातून 300 क्यूसेस आणि डावा कालवा विद्युत ग्रहातून 1 हजार 400 क्यूसेस असे एकूण नीरा नदी पात्रात 6 हजार 118 क्यूसेस पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुहागर वेळणेश्वर येथे भरतीचे पाणी लोक वस्तीपर्यंत शिरले
गुहागर वेळणेश्वर येथे भरतीचे पाणी लोक वस्तीपर्यंत शिरले आहे. याबाबत लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या कोणतेही नुकसान झाले नाही. सध्या ओहोटी सुरु झाली आहे.
RTMNU : नागपूर विद्यापीठाच्या आज व उद्याच्या परीक्षा रद्द
नागपूरः सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यापीठाच्या आज (15 जुलै) व उद्या म्हणजेच 16 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षांना स्थगित करण्यात आले आहे. तिन शिफ्ट मध्ये परीक्षा होणार होत्या. या रद्द झालेल्या परीक्षांबाबत विद्यापीठाच्यावतीने नंतर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्यावतीने देण्यात आली.
वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये 27 दरवाजे 1 मिलिमीटर तर 6 दरवाजे हे 0.50 मिलिमीटरने उघडण्यात आले आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळं वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळं प्रशासनानं खबरदारी घेत गोसिखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे.