एक्स्प्लोर

Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला

राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला

Background

Maharashtra Mumbai Rain Live :  सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभगानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांवी नागरिकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. तसेच रायगडमध्येही चांगला पाऊस सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये देखील चांगला पाऊस सुरु आहे.

हिंगोलीत पावसाचा हाहाकार 

हिंगोली जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये पावसानं हाहाकार घातला आहे. तिथे ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. रात्री रात्रभर झालेल्या पावसानं  कुरुंदा गावाजवळ असलेल्या आसना नदीला पूर आला आहे. पाणी नदी पत्रातून थेट कुरुंदा गावात शिरलं आहे. गावात सर्वच्या घरात पाणी शिरलं होतं. यामुळं घरातील संस्कार उपयोगी  साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.  जोरदार झालेल्या पावसाने गावातील मोबाईल नेटवर्क त्याचबरोबर विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. 

लातूर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीलायक पाऊस झाला नव्हता. सकाळपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. संध्याकाळनंतर मात्र पावसानं चांगलाच जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.

संततधार पावसानं हिवरा येथील पुल गेला वाहून

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं हिवरा (जगताप) येथील अजनसरा लगत असलेला हिवरा येथील पूल वाहून गेला आहे. अचानक पुल वाहुन गेल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन घर जवळ करावं लागत आहे.

कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रारातील काही भागात रेड अलर्ट

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

15:40 PM (IST)  •  09 Jul 2022

हिंगोलीत एनडीआरएफच्या पथकाने वाचवले सात जणांचे प्राण   

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने कुरुंदा किनोळा माळवठा आसेगाव या गावांना या पुराचा फटका बसला आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.  या पुरामध्ये अडकलेल्या सात नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढले आहे. 

जिल्ह्यातील पूर हळूहळू ओसरत आहे. परंतु, या पुरात किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर येत आहे. या भागातील जवळपास 90 टक्के शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले असून शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाई, म्हशी पुरामध्ये वाहून गेले आहे.  त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

15:32 PM (IST)  •  09 Jul 2022

Latur Rain : लातूर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग, बळीराजा सुखावला 

लातूर आणि परिसरात काल सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केलीय. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. 

लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीसाठी पोषक असलेला पाऊस झाला नव्हता. काल सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते . सकाळपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. काल संध्याकाळ नंतर मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मध्यरात्री नंतर सुद्धा पावसाचा जोर सुरू होता.  

15:09 PM (IST)  •  09 Jul 2022

हिंगोलीत NDRF च्या टीमने 7 लोकांना सुखरुप काढले बाहेर 

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने कुरुंदा, किनोळा, माळवठा, आसेगाव या गावांना या पुराचा फटका बसला आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सध्या पाऊस कमी झाला आहे. दरम्यान, या पुरामध्ये अडकलेल्या एकूण सात नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढले आहे. हळूहळू पूर ओसरत आहे. या पुरात किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर येत आहे. या भागातील जवळपास 90 टक्के शेतजमीन ही पाण्याखाली आली आहे. 90 टक्के शेत जमिनीवरील पूर्णपणे नुकसान झाले आहे. 

12:50 PM (IST)  •  09 Jul 2022

वेण्णा नदीचं पाणी रस्त्यावर, महाबळेश्वर-पाचगणी वाहतूक थांबवली

Satara Rain : सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळं वेण्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील वाहतूक थांबवली आहे. पर्यटक रस्त्यात अडकले आहेत. पावसाचा जोर वाढल्याने वेण्णा नदीतल्या सांडव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलं आहे.


12:41 PM (IST)  •  09 Jul 2022

Navi Mumbai News : सिडकोकडून उभारण्यात आलेल्या रोरो सेवेच्या उड्डाणपुल, जेट्टीला तडे, कामाच्या दर्जाबाबत संशय

Navi Mumbai News : सिडकोचा महत्वकांशी प्रकल्प असलेल्या रोरो सेवेच्या कामाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण आहे नेरूळ खाडीवर उभारलेल्या जेट्टीस पडलेले तडे. नवी मुंबंई ते मुंबंई, भाऊचा धक्का, अलिबाग, मांडवा या ठिकाणी जाण्यासाठी रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या रोरो सेवेतून प्रवाशांबरोबर टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यासुध्दा बोटीतून घेऊन जाता येणार आहे. यासाठी सिडकोकडून 110 कोटी रूपये खर्च करत नेरूळ खाडीवर जेट्टी उभारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच उभारलेल्या या जेट्टीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. जेट्टीवर जाण्यासाठी 600 मीटरचा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. उड्डाण पुलावरील दोन्ही बाजूच्या संरक्षित भिंतीला, डांबरीकरण केलेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान याबाबत सिडको अधिकार्यांशी बोललो असता त्यांनी कॅमेरा समोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सदरच्या कामात पडलेल्या भेगा या जिथे एक्सपान्शन जॅाईंट आहेत. तिथल्या असल्याचं स्पष्टीकरण सिडकोकडून देण्यात आलं आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget