Maharashtra Rain Live Updates : कोकण रेल्वेवरील दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच रेल्वेसेवा चालू होण्याची शक्यता!
Maharashtra Mumbai Rain Update LIVE : महाराष्ट्रात आजही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
LIVE
Background
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर् जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कृष्णा कोयना नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कृष्णाच्या पात्रात एका रात्रीत दहा फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे येथील यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Konkan Railway : कोकण रेल्वेवरील दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच रेल्वेसेवा चालू होण्याची शक्यता!
कोकण रेल्वेवरील दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे...
मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर असलेली माती हटवली गेली आहे...
त्यामुळे ट्रॅकवर असलेल्या मातीचे प्रमाण हे आता तुलनेने कमी आहे...
सध्या ट्रॅकच्या बाजूला असलेली माती काढण्याला प्राधान्य दिले जात आहे...
माती सोबतच त्या ठिकाणी पाण्यालादेखील मार्ग करून दिला जात आहे...
त्यामुळे किमान आणखी दोन तासाच्या अवधीमध्ये ठप्प असलेली कोकण रेल्वे हळूहळू का असेना मार्गस्थ होईल...
पण पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी हा जास्त असणार आहे
रेल्वेस्थानकावर अडकलेल्यांना मुंबईत पाठवण्यासाठी बसेसची सोय
मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. परिणामी अनेक प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले आहेत. त्यांना परत मुंबई जाण्यासाठी बसेसची सोय केली जात आहे.
ST buses are being arranged at KR stations for facilitating passengers traveling towards Mumbai.
— Konkan Railway (@KonkanRailway) July 15, 2024
Inconvenience caused is deeply regretted.@RailMinIndia pic.twitter.com/YphrYTQV69
पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे जाहीर झालेल्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी दूर व ऑनलाईन शिक्षण केंद्र, मुंबई विद्यापीठ यांच्या ( सोमवार) दिनांक 15 जुलै 2024 रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
Ratnagiri Rain : दापोली तालुक्यात डोंगर खचला, पावसाचे थैमान
रत्नागिरी : दापोली तालुक्यात साखलोळी येथे डोंगराची माती खाली आली
डोंगर खचतानाचा व्हिडिओ समोर
पूर्णच्या पूर्ण डोंगर खचून आलाय खाली
डोंगर खचतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद
Ratnagiri Rain : पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प, रत्नागिरी रेल्वेस्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना बसद्वारे मुंबईत सोडलं जाणार
रत्नागिरी- कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे आता परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्था
विविध स्टेशनवरून खोळंबलेल्या प्रवाशांना एसटी बसच्या माध्यमातून सोडलं जाणार
रत्नागिरी रेल्वेस्थानकावर शेकडो प्रवासी एसटी बसच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी स्थानकावरून 25 बस सोडल्या जाणार
एसटीच्या बसेसने अडकलेल्या प्रवाशांना थेट मुंबईत सोडलं जाणार