Maharashtra Holi Guidelines : होळी, धुळवडीसाठी सरकारकडून नियमावली जारी; या गोष्टी पाळाव्याच लागतील...
Maharashtra Holi Dhulivandan Guidelines : होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली आहे.
Maharashtra Holi Dhulivandan Guidelines : होळीच्या (Holi 2022) सणाची सर्वत्र लगबग सुरु आहे. कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी देखील होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली आहे. हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत. रात्री दहाच्या आत होळी करावी तसेच डीजे लावण्यास बंदी घातली आहे. डीजे लावल्यास कायदेशीर बंदी घातली आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास देखील कारवाई केली जाणार आहे.
कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्यानं मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. आता उद्या, 17 तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये अशी देखील सूचना देण्यात आली आहे. जोरात लाऊड स्पीकर लावल्यास कारवाई केली जाणार आहे.
होळी धुळवडीसाठी सरकारची नियमावली
रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक
डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई
होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई
महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी
दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये, जोरात लावल्यास कारवाई
कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये
धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित इतर बातम्या
Inflation : होळीच्या तोंडावर महागाईचा भडका! चिकन, मिरची, मॅगी, अंडी आणि बरंच काही...