Maharashtra Corona Update : राज्यातील 1141 तर मुंबईत 330 नव्या रुग्णांची नोंद, मृतांची संख्या घसरली
Maharashtra Corona Update : मुंबईत आज केवळ 5 रुग्णांचा मृत्यू झाला तर राज्यात एकूण 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी हजाराच्या जवळपास स्थिर आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयांना जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, एकूण 1,141 रुग्णांची भर पडली आहे तर एकूण 32 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासामध्ये राज्यात एकूण 1,163 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64,56,263 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.6 टक्के एवढे झाले आहे.
Pune Coronavirus Vaccination : दिवाळीत पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद!
राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या 15 हजार 062 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,86,432 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 878 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,30,47,584 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 4160 सक्रिय रुग्णसंख्या असून त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागतोय. पुणे जिल्ह्यात 3190 सक्रिय रुग्णसंख्या आहे. जळगाव (8), नंदूरबार (1), धुळे (1), जालना (28), बीड (59), लातूर (35), परभणी (39), हिंगोली (20), नांदेड (22), अकोला (20), अमरावती (17), वाशिम (02), अकोला (20), बुलढाणा (08), नागपूर (36), यवतमाळ (05), वर्धा (7), भंडारा (2), गोंदिया (2), चंद्रपूर (18) गडचिरोली (3) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
Mumbai Vaccination : मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर गुरुवार ते रविवार लसीकरण बंद राहणार
मुंबईत 330 रुग्ण तर पाच जणांचा मृत्यू
मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्याही सध्या स्थिरावली असल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासात शहरात 330 रुग्णांची नोंद झाली तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 378 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता 1642 दिवस इतका झाला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 3, 2021
३ नोव्हेंबर, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण-३३०
२४ तासात बरे झालेले रुग्ण-३७८
बरे झालेले एकूण रुग्ण-७३४५९०
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७%
एकूण सक्रिय रुग्ण-३३८६
दुप्पटीचा दर-१६४२ दिवस
कोविड वाढीचा दर (२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर)-०.०४%#NaToCorona
COVID19 Cases Update : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 98.22 टक्क्यांवर