एक्स्प्लोर

राज्यातील सर्वाधिक वायू प्रदूषण 'या' शहरांत, हवेची गुणवत्ता ढासळली; तुमचं शहर या यादीत आहे का?

Maharashtra most polluted city : महाराष्ट्रातील प्रदुषित शहरांची देखील यादी समोर आली आहे. यात  मुंबई शहर आणि उपनगरांमधील एअर क्वालिटी ढासळली असल्याचं समोर आलं आहे.

maharashtra most polluted city : सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय. फक्त राजधानी दिल्लीच नव्हे तर भारतातील तब्बल 46 शहरांतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आता समोर आलं आहे. जगभरातील टॉप 100 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील तब्बल 46 शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रदुषित शहरांची देखील यादी समोर आली आहे. यात  मुंबई शहर आणि उपनगरांमधील एअर क्वालिटी ढासळली असल्याचं समोर आलं आहे. बीकेसीतील नोव्हेंबरमधील सरासरी एक्यूआय 202 वर म्हणजे वाईट श्रेणीत समावेश झाला असल्याचं समोर आलं आहे. 

टॉप 10 शहरांमधील नोव्हेंबर महिन्यातील सरासरी एक्यूआय मध्यम श्रेणीत आहे.  मुंबईतील ठिकाणांसह कल्याण, नवी मुंबई आणि पुणे शहरातील ठिकाणांचाही समावेश यात झाला आहे.  पुण्यातील कोथरुडमध्ये देखील एअर क्वालिटी ढासळली आहे.  नोव्हेंबरमधील कोथरुडचा सरासरी एक्यूआय 147 वर आहे. 

Polluted Cities : धोका वाढतोय! जगभरातील टॉप 100 प्रदुषित शहरात भारताची तब्बल 46 शहरं

मेट्रोची सुरु असलेली कामं, रस्त्यांवर वाढलेली वाहनांचा संख्या, स्मॉग आणि धुळीच्या एकत्रित परिणामांमुळे परिस्थिती ढासळल्याचं निरीक्षण करण्यात आलं आहे. यामुळं आजारी  लोकांना आरोग्यविषयक अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. वाईट श्रेणीतील हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे. 

कोणत्या शहरात काय परिस्थिती? 
 
(नोव्हेंबर महिन्यातील सरासरी) 

बीकेसी - 202 एक्यूआय
कुलाबा - 176 एक्यूआय 
कुर्ला - 165 एक्यूआय 
विलेपार्ले - 164 एक्यूआय 
माझगाव - 162 एक्यूआय 
कोथरुड, पुणे - 147 एक्यूआय 
नेरुळ, नवी मुंबई - 146 एक्यूआय 
खडकपाडा, कल्याण - 134 एक्यूआय 
वरळी - 133 एक्यूआय 
महापे, नवी मुंबई - 120 एक्यूआय

हवेची गुणवत्ता कशी तपासली जाते?
पार्टिकुलेट मॅटर (PM) 2.5, PM10, ओजोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइडच्या स्तऱाच्या आधारावर हवेची गुणवत्ता तपासली जाते. पार्टिकुलेट मॅटर अत्यंत सूक्ष्म कण आहे, जो आरोग्याला  हानी पोहचवतो. हवेत PM 2.5 आणि PM10 असणे अतिशय धोकादायक मानलं जाते. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget