एक्स्प्लोर

Monsoon Updates: खुशखबर! 10 जूनला मान्सून मुंबई येणार, तर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पावसाची शक्यता

Maharashtra Rains: येत्या 10 किंवा 11 जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून 15 जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Maharashtra Monsoon Updates : मुंबई : उकाड्यानं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) हैराण झाला आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होतेय. तर आता सर्वांनाच पावसाचे वेध लागलेत. रेमल वादळामुळे मान्सूनच्या (Mumbai Monsoon News) प्रवासाला वेग आला असून लवकरच मान्सून (Monsoon News) महाराष्ट्रत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच उन्हाच्या तडाख्यापासून लवकरच सुटका होणार हे मात्र नक्की. येत्या 10 किंवा 11 जूनला मुंबईत (Mumbai Rains) पावसाची सुरुवात होणार असून 15 जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकीकडे केरळमध्ये मान्सूनची चाहूल लागली असताना महाराष्ट्रासह उत्तर भारतात उन्हाचा तडाखा जाणवतोय. रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला आहे. त्यामुळे आगामी 2-3 दिवसांत मान्सून केरळमध्ये प्रवेश करण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांची होरपळ होत आहे. हवामान खात्यानं पुढील एक ते दोन दिवस विदर्भात तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

उत्तर भारतातील अनेक राज्य सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशाच्या आसपासच्या भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, 29 मे पासून एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि गारपिटी देखील होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 3 दिवसांनंतर पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस; दुसरीकडे दुष्काळाची भीषण परिस्थिती

महाराष्ट्रात एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस होत असताना, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. यंदाच्या भीषण दुष्काळामुळे पंढरपूरमधील उजनी धरणातील पाणी पातळी नीचांकी पातळीवर गेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणी आटल्यानं धरणाच्या जमिनीला भेगा पडल्याचं दृश्य दिसतंय. तर धरणातील पाणी कमी झाल्यानं मंदिरंही पाण्याबाहेर दिसत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget