एक्स्प्लोर

Maharashtra Monsoon Rain LIVE : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनची जोरदार हजेरी, शेतीचं मोठं नुकसान

Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Monsoon Rain LIVE : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनची जोरदार हजेरी, शेतीचं मोठं नुकसान

Background

Maharashtra Monsoon Rain LIVE : सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, जालना या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण या पवसामुळं शेतकरी आता खरीपाच्या पेरणीच्या तयारीला लागणार आहेत.

राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर राज्यातील बहुतांश भागात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे. पावसाअभावी शेतीची काम खोळंबली होती, त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीची अडचण टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे.  

दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी पेरणीची गाई करु नये

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस जरी होत असला तरीसुद्धा 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही शेतकर्‍यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये असे मत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तथा व्यवस्थापन तज्ञ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे गजानन गडदे  व्यक्त केलं आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरु शकते. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं जे आज परवडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी आत्ताच पेरणीची घाई करु नये असे आवाहन गजानन गडदे यांनी केलं आहे.

पेरणी करताना नेमकी काय काळजी घ्याल?

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतातील जमिनीची ओल तपासावी. ती ओल जर एक वीतभर गेली असेल तर पेरणी करण्यास काही हरकत नसल्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे. वितभर ओल गेल्यास पेरणी करायला काही अडचण नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकासन होणार नसल्याचे डख म्हणाले.  बियाणे चांगले वापरा, विद्यापीठानं सांगितलेलं बियाणे वापरा असा सल्लाही डख यांनी दिला.

20:08 PM (IST)  •  12 Jun 2022

बीडमधील मच्छिंद्रनाथ मुसळधार पाऊस 

बीडमधील मच्छिंद्रनाथ मुसळधार पाऊस झाला आहे. आष्टी आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सावरगाव, मच्छिंद्रनाथ गड परिसरात शनिवारी मुसळधार पावसामुळे गर्भगिरी पर्वतरांगाखालील सर्व तलाव एकाच पावसात ओव्हरफलो झाले आहेत.

आष्टी तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून वरूण राजाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत दुष्काळ मिटवून टाकला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही तालुक्यात मोठ्या पावसाची सुरुवात झाली आहे.

आष्टी तालुक्यामध्ये रोहिणी नक्षत्र कोरडे गेले.  मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन चार दिवस झाल्यानंतर तालुक्यातील इतर ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. तर मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव शेडगेवाडी या परिसरामध्ये एकच पावसात सर्व तलाव तुडुंब भरले आहेत. 

17:35 PM (IST)  •  12 Jun 2022

Aurangabad : जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरवात

Aurangabad Rain Update: सलग तिसऱ्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. चापानेर, महालगांव, कन्नड, आधानेर या ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहे.

13:23 PM (IST)  •  12 Jun 2022

कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर पावसाची दमदार हजेरी, नेबापूरमधील घरात शिरलं पाणी

Kolhapur Rain : कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर पावसानं दमदार हजेरी लावली आहे. जिओ ग्रेड पद्धतीनं नवीन बांधलेल्या रस्त्यावरुन पाणी नेबापूरमध्ये गेलं आहे. गतवर्षी आलेल्या महापुरात पन्हाळा गडावरील हाच रस्ता खचला होता. आज आलेल्या पावसाने नेबापूरमधील घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

12:53 PM (IST)  •  12 Jun 2022

जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यात वादळी पावसानं 15 घरं कोसळली

Jalgaon Rain : जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात काल आणि परवा झालेल्या वादळी वारा आणि पावसानं पंधरा घरे कोसळली आहेत. तसेच यामध्ये एका गाईचा मृत्यू झाला आहे. तर पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचे बांध फुटून त्यांच्या कापूस पिकाचा आणि शेतीचा कस वाहून गेल्याचे समोर आलं आहे.

12:26 PM (IST)  •  12 Jun 2022

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनची जोरदार हजेरी, शेतीचं मोठ नुकसान

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव आणि नगर तालुक्यात झालेल्या पावसानं शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. जेऊर, ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर परिसरांत जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडुंब भरलेत. शेतकऱ्यांचे बांध मोठ्या प्रमाणात फुटले असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत आहेत. तर रस्त्याच्या बाजूला असलेले बोर्ड देखील वाऱ्याने पडलेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kalate: चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
CJI DY Chandrachud : पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनीच पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
Jammu And Kashmir : कलम 370 नंतर आता मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा निर्णय घेतला; येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक येणार!
कलम 370 नंतर आता मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा निर्णय घेतला; येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक येणार!
Maharashtra Assembly Elections 2024 : शिवडीत अजय चौधरी-सुधीर साळवींची गळाभेट, उद्धव ठाकरेंचं टेन्शन मिटलं, बालेकिल्ला अजिंक्य राहणार?
शिवडीत अजय चौधरी-सुधीर साळवींची गळाभेट, उद्धव ठाकरेंचं टेन्शन मिटलं, बालेकिल्ला अजिंक्य राहणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Candidate :  शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर, Jayant Patil यांची पत्रकार परिषदAJit Pawar Vs Harshvardhan Patil:मी पहाटे उठून कुठेही जाणार नाही,अजितदादांची टीका,पाटलांचा खोचक टोलाAavdiche Khane Rajkiya Tane Bane:माहिममधून माघार का घ्यायची,नेहरू उभे आहेत का?Sanjay Raut ExclusiveGanesh Gite Nashik : उमेदवारी मिळाल्यानंतर गणेश गीतेंचं नाशिकमध्ये स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kalate: चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
चिंचवडमधून तुतारीचा उमेदवार ठरला! राहुल कलाटेंना दिली संधी, नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम, उद्याचं दाखल करणार अर्ज
CJI DY Chandrachud : पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनीच पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
पीएम मोदी गांधी टोपीत घरी गणपतीची पूजा करून गेले, आता थेट सरन्यायाधीशांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली!
Jammu And Kashmir : कलम 370 नंतर आता मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा निर्णय घेतला; येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक येणार!
कलम 370 नंतर आता मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा निर्णय घेतला; येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक येणार!
Maharashtra Assembly Elections 2024 : शिवडीत अजय चौधरी-सुधीर साळवींची गळाभेट, उद्धव ठाकरेंचं टेन्शन मिटलं, बालेकिल्ला अजिंक्य राहणार?
शिवडीत अजय चौधरी-सुधीर साळवींची गळाभेट, उद्धव ठाकरेंचं टेन्शन मिटलं, बालेकिल्ला अजिंक्य राहणार?
Parli Assembly constituency : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार जाहीर; मराठा कार्ड दिल्याने तुल्यबळ लढत होणार!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंविरोधात तगडा उमेदवार जाहीर; मराठा कार्ड दिल्याने तुल्यबळ लढत होणार!
अभिनेत्रीचा पती राष्ट्रवादीत, फहाद अहमदला मुंबईतील उमेदवारी; जयंत पाटलांनी सांगितलं राज'कारण'
अभिनेत्रीचा पती राष्ट्रवादीत, फहाद अहमदला मुंबईतील उमेदवारी; जयंत पाटलांनी सांगितलं राज'कारण'
शरद पवारांची मोहोळमध्ये सरप्राईज उमेदवारी, माजी आमदाराची ‘लेक लाडकी’ मैदानात, माढ्यातून कुणाला उमेदवारी?
शरद पवारांची मोहोळमध्ये सरप्राईज उमेदवारी, माजी आमदाराची ‘लेक लाडकी’ मैदानात, माढ्यातून कुणाला उमेदवारी?
Babanrao Gholap : काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
Embed widget