Maharashtra MLC Election Results 2023 Live: अमरावती पदवीधर मतदारसंघात 8735 अवैध मतांची पुन्हा पडताळणी सुरू; निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता
Vidhan Parishad Election Results 2023 LIVE Updates: विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज. सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली. सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात होणार आहे. राज्यातील नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा निकाल काही तासांवर आहे. पण, त्यातल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.
नाशकात गुलाल कुणाचा?
काँग्रेसनं डॉक्टर सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाचा अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशिकतली रगंत आणखी वाढली. काँग्रसेचा एबी फॉर्म असतानाही सुधीर तांबेंनी अर्ज भरला नाही.तर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरला. तिकडे काँग्रेसनं तांबे पितापुत्रांचा निलंबनं केलं आणि भाजपच्या बंडखोर शुभांगी पाटलांनी मातोश्री गाठलं. पुढे त्यांना मविआनं अधिकृत उमेदवारी दिला आणि नाशिकची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली.
विक्रम काळे पुन्हा 'विक्रम' करणार?
राज्यातील नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर चर्चेत होतीच. त्याचबरोबर औरंगाबादच्या निवडणुकीकडेही लक्ष होतं. कारण, भाजपनं नवख्या किरण पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पहिल्यांदा निवडणूक लढवणारे किरण पाटील यांच्यासमोर विक्रम काळेंचं तगडं आव्हान उभं होतं आणि म्हणून औरंगाबादच्या निवडणुकीचा चर्चा रंगली..
रणजीत पाटील पुन्हा गुलाल उधळणार?
अमरावतीत भाजपचे रणजीत पाटील हे तिसऱ्यादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात मविआचे धीरज लिंगाडे उभे आहेत. तर तिकडे नागपुरात 22 उमेदवार रिंगणात आहे. पण, इथं चौरंगी लढत रंगली. काँग्रेसकडून सुधाकर आडबाले, भाजप समर्पित विद्यमान आमदार नागो गाणार,
शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून सतीश इटकेलवार मैदानात आहेत. त्यामुळे इथं कुणाचा गुलाल उधळणार.. हे अवघ्या काही तासांमध्ये कळेल...
कोकणातही थेट फाईट
कोकण शिक्षक मतदारसंघात मविआचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत आहे. त्यामुळे याठिकाणी होतंय, याकडेही लक्ष असेल. जागा पाच आहे पण, त्यांना विधिमंडळात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पाचही जागांवर आपला उमेदवार जिंकावा. यासाठी दोन्ही आघाड्यांवर प्रयत्न झाले. तशा प्रचारसभा झाल्याआणि आता नेमकं यश कुणाला मिळणार आहे. याकडे सत्ताधाऱ्यासह विरोधकांचं लक्ष लागलंय
Amaravati MLC Election: अमरावती पदवीधर मतदारसंघात अवैध मतदानाची तपासणी; 8735 अवैध मतांची पुन्हा पडताळणी सुरू
अमरावती पदवीधर मतदारसंघात अवैध मतदानाची तपासणी सुरू आहे. 8735 अवैध मतांची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आली आहे. भाजप उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींनी अवैध मतांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली होती. अंतिम मतमोजणीत मविआचे उमेदवार धिरज लिंगाडे हे 2313 मतांनी आघाडीवर आहेत.
Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय, 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी
Nashik MLC Election : नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे विजयी
सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मते
शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते
सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी


















