एक्स्प्लोर

आधी 'पॉवरफुल', आता बत्ती गुल; नेत्यांची सुरक्षा काढून घेतली, शिंदेंच्या आमदारांची सटकली

Maharashtra MLA Security News : आधी पुढे-मागे पोलिसांचा लवाजमा घेऊन रुबाबात फिरणाऱ्या शिंदेंच्या आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना एकच सुरक्षा रक्षक देण्यात आला आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीसांकडे असलेल्या गृहविभागाच्या एका निर्णयानं सध्या अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याच शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्याचं झालं असं की अपुऱ्या पोलिस बळामुळे अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यात माजी मंत्री आणि आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. पण ही सुरक्षा कपात शिंदेंच्या आमदारांना रुचलेली नाही अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

गृहखात्याच्या निर्णयामुळे शिंदे नाराज?

राज्याच्या गृहखात्यानं लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पण गृहखात्याच्या या निर्णयावरुन महायुतीतच संघर्षाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे. कारण सुरक्षेत कपात करण्यात आलेले सर्वाधिक आमदार हे शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. 

व्हीआयपींच्या सुरक्षेत नेमके कोणते बदल करण्यात आलेत यावर एक नजर टाकूयात,

  • सर्वपक्षीय माजी आमदार आणि माजी खासदारांची सुरक्षा काढण्यात आली आहे.
  • सर्वपक्षीय विद्यमान आमदारांची वाय प्लस सुरक्षा काढून केवळ एक कॉन्स्टेबल देण्यात आला आहे. 
  • माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. 
  • मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची झेड प्लस सुरक्षा कायम आहे. 
  • शरद पवार, उद्धव ठाकरे यांची झेड प्लस सुरक्षा कायम आहे.
  • राज ठाकरे, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, श्रीकांत शिंदे यांची वाय प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. 

शिंदेंचे आमदार नाराज

यात भाजप आणि राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असला तरी संतापाचा भडका मात्र शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांचा उडाल्याचं दिसतंय. कारण सुरक्षाकपातीचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या आमदारांनाच बसला आहे. माजी मंत्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, सुहास कांदे, अभिजीत अडसुळ आणि प्रकाश सुर्वे यांच्यासह 20 आमदारांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे शिंदेंचे आमदार नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे...

या सुरक्षा कपातीवरून सुरू असलेल्या नाट्यावर संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलंन हल्लाबोल केला. त्यांनी या राज्यात वाय झेड करून टाकली आहे, हे वेड्यांचे सरकार आहे. हे मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयात गोंधळ आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

त्यांना नितेश राणेंनी त्याच भाषेत उत्तर दिलंय. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. त्यांची सुरक्षा काढली तर त्यांनी लोक त्यांना अंडी, टमाटे मारतील. 

गृहखात्याच्या निर्णयाचं स्वागत

राज्यात पोलिसांची संख्या पुरेशी नाही. पोलिस बळाच्या कमतरतेचा मुद्दा अनेकदा समोर आला. त्यामुळे अनेक वेळा पोलिसांना 12 ते 14 तास ड्युटी करावी लागते. वेळप्रसंगी ते 24 तास ऑन ड्युटी असतात. मात्र काही नेतेमंडळी आपल्या सभोवती पोलिसांचा गोतावळा असणं ही रुबाबाची गोष्ट समजतात. त्यामुळे गृह खात्याच्या या निर्णयाचं एकीकडे स्वागतही केलं जात आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics:वसंतदादा शुगर इन्सिट्युट चौकशीसंबधी संशयकल्लोळ,बैठकीचं इतिवृत्त 'माझा'च्या हाती
Pune Jain Boarding Case: पुणे जैन बोर्डिंग वाद प्रकरणी सुनावणी 30 तारखेला
Maharashtra Politics 'भाजप देशात अनेक ठिकाणी कुबड्यांवर, महाराष्ट्रात 2,शहांना राऊतांचं प्रत्युत्तर
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे भस्म्या रोग झालेला Anaconda, एकनाथ शिंदेंच प्रत्युत्तर
Cartoon War'मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता',Navnath Ban यांचे Ravindra Dhangekarयांना प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
Nashik Crime Prakash Londhe: प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
प्रकाश लोंढे टोळीला मोठा दणका; नाशिक पोलिसांकडून थेट मकोका अंतर्गत कारवाई
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा
The Family Man 3rd Season: ‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
‘द फॅमिली मॅन’ परत येतोय! मनोज वाजपेयीचा श्रीकांत तिवारी पुन्हा OTT गाजवणार, तिसरा सीझन कधी रिलीज होणार?
हाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू
हाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू
Prakash Mahajan : खाल्ल्या अन्नाला तरी जागा, चार पायाचे कुत्रं देखील खाल्ल्यांनंतर जागतं, तुम्ही त्या पुढे गेलात; प्रकाश महाजनांनी पुन्हा टीकेचं टोक गाठलं, सारंगींकडे संशयाचे बोट
खाल्ल्या अन्नाला तरी जागा, चार पायाचे कुत्रं देखील खाल्ल्यांनंतर जागतं, तुम्ही त्या पुढे गेलात; प्रकाश महाजनांनी पुन्हा टीकेचं टोक गाठलं, सारंगींकडे संशयाचे बोट
मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
मराठी रंगभूमीवर शोककळा! ‘वस्त्रहरण’चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन
Embed widget