Jitendra Awhad: आमदार अपात्रता प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांची केवळ पाच शब्दात प्रतिक्रिया
MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केवळ पाच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यांना पक्षातून काढण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्याशिवाय एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होऊ शकत नाहीत, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. राहुल नार्वेकरांच्या या निर्णायाविरोधात ठाकरे गट न्यायालयीन लढाई लढणार आहे. असे असतांनाच यावर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केवळ पाच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी फक्त पाच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी, 'येह तो होना ही था' असं म्हटलंय. सोबतच त्यांनी #ठाकरे असा हॅशटॅग वापरत, न्यायाची अपेक्षा कोणाकडून करता... जनता न्याय करेल असा धीर देखील दिला आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदेच्या बाजूने
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. त्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने निकाल देत पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना दिलं. सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदे यांची ही पहिली बाजी होती.
सर्वोच्च न्यायालयातही वरचढ
शिवसेनेचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी झालेल्या युक्तिवादात एकनाथ शिंदे यांच्या गटानेच बाजी मारल्याचं दिसून आलं. त्यावेळी शिंदे गटाचं सर्व काही चुकलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे आपण परत मागे जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्याचे आदेश दिले.
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय शिंदे यांच्याच बाजूने
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांसमोर आल्यानंतर या ठिकाणीही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर मात केल्याचं दिसलं. दोन्ही गटाचे आमदार अपात्र ठरले नसले तरीही शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा राहुल नार्वेकरांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या