Sanjay Raut : संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार; जामीन मिळणार? आज पुन्हा कोर्टात सुनावणी
Sanjay Raut : ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे
Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज जामीन मिळणार की कोठडी? याचा आज फैसला होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या (ED) अटकेत असलेल्या संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे
संजय राऊतांना आज जामीन मिळणार की कोठडी?
ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. ईडी आज पुन्हा एकदा कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे
प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते?
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांची ईडी कोठडी 4 ऑगस्ट रोजी संपत आहे. ईडीने राऊतांना 31 जुलैला रात्री उशिरा भांडुपच्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली होती. या प्रकरणी ईडीने असा दावा केला होता की, संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होते, खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते, आमच्याकडे याचे पुरावे आहेत. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर जामीन मिळाला तर ते पुन्हा धमकाविण्याचं किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात, तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात, याचं नेमकं कारण काय? असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते, ते कशासाठी? असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले?
संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितलं. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचं नाव आलं असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
Sharad Pawar : संजय राऊत यांच्या अटकेवर शरद पवार गप्प का? पवारांचं मौनही बोलकं