एक्स्प्लोर

Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या अडचणी संपेना; मुंबई महापालिकेच्या टीमकडून आज 'त्या' घराची पाहणी, कारवाई होणार?

Navneet Rana : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बीएमसीने नोटीस बजावली आहे.

Navneet Rana :  राणा दाम्पत्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.  राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बीएमसीने नोटीस बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या नोटीसनुसार, मुंबई बीएमसी खारच्या इमारतीत असलेल्या रवी राणा यांच्या घराची पाहणी करणार आहे. प्रत्यक्षात घराच्या आराखड्यात छेडछाड करून बेकायदा बांधकाम केल्याचा बीएमसीला संशय आहे. अशा स्थितीत अति बांधकाम आणि काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून बीएमसीने ही तपासणी नोटीस दिली आहे.

मुंबई महापालिकेकडून नोटिस 

आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत रवी राणा हे दोघंही गेल्या 10 दिवसापासून तुरुंगात आहेत. त्यामुळं त्यांच्या घरी कोणीच नाही. त्यामुळं मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंद दारावर आज नोटिस चिकटवली. मंजूर आराखड्याव्यतिरिक्त बांधकाम आणि काही नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेकडून तपासणीसाठी नोटिस पाठवण्यात आली आहे. रवी राणा यांच्या मुंबईच्या खारमधील फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम असल्याचा आरोप करून मुंबई महापालिकेकडून या फ्लॅटचं 4 मे रोजी मोजमाप करण्यात येईल अशी नोटिस पाठवण्यात आली आहे. सोसायटीचे पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी  राणा यांच्या नावे ही नोटिस पाठवण्यात आली आहे. 

राणा दाम्पत्य सध्या कोठडीत 
राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी केली होती. सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. त्याबाबची सुनावणी आज न्यायालयात पार पडली. राणा दाम्पत्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. 4 मे रोजी आता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.  आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा राहत असलेल्या सोसायटीच्या पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी  राणा यांचे नावे नोटीस पाठवण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या :

Hanuman Chalisa Row : राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला, जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

नवनीत राणांना स्पॉंडिलायसिस, अनिल देशमुखांना खांदेदुखी तर मलिकांना मुत्राशयाचा विकार; उपचारासाठी मागितल्या परवानग्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget