Mass Copy : राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान मास कॉपी, बाकावर थेट पुस्तकाची पाने, होणार का कारवाई?
Mass Copy : राज्यमंत्र्यांच्याच महाविद्यालयात सर्रासपणे होत असलेला कॉपीचा प्रकार पाहून शिक्षणमंत्री काय कारवाई करतात? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
Mass Copy : एकीकडे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत परीक्षेदरम्यान कॉपी करताना जर कोणी आढळले, तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल अशी तंबी दिली. तरीदेखील काही शाळा-महाविद्यालयांमध्ये कॉपी काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. येथे तर खुद्द औरंगाबाद जिल्ह्यातील फरदापुर मध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये मास कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान मास कॉपी
फरदापुर येथील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. दरम्यान मंगळवारी हिंदीचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांकडून चक्क मास कॉपी होत असतानाचा प्रकार पाहायला मिळाला. येथील विद्यार्थ्यांकडून सर्रास कॉपी करताना दिसून आले. या महाविद्यालयात परीक्षार्थी थेट बाकावर पुस्तकाची पाने ठेवूनच उत्तरे लिहीत असताना कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. तर त्यांना कॉपी पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत देखील कमालीची होती. दरम्यान कॉलेजच्या खिडकीच्या बाहेर असंख्य कॉप्यांचा खच पडलेला देखील पाहायला मिळाला.
होणार का कारवाई?
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत परीक्षेदरम्यान कॉपी करताना जर कोणी आढळले, तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल अशी तंबी दिली होती, मात्र आता राज्यमंत्र्यांच्याच महाविद्यालयात सर्रासपणे होत असलेला कॉपीचा प्रकार पाहून शिक्षणमंत्री काय कारवाई करतात? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
गोंदिया जिल्ह्यातही असाच प्रकार समोर, पालकानेच काढला होता व्हिडिओ
कोरोना महामारीचा (Coronavirus) प्रभाव हळूहळू कमी झाला आणि त्यानंतर तब्बल 2 वर्षानंतर ऑफलाईन पद्धतीने (Offline Exams) परीक्षा सुरु झाल्या, गोंदिया (Gondia District) जिल्ह्याच्या मोरगांव अर्जुनी तालुक्यातील बहुउद्देशीय शाळेत 10 वी च्या परिक्षेला चक्क सामूहिक कॉपीचा प्रकार घडला आहे. दरम्यान संबंधित शाळेकडून कॉपीसाठी सहकार्य करत विद्यार्थ्यांना पास करण्यात येत असल्याची बाबही समोर आली होती. गणित विषयाचा 24 मार्चला पेपर सुरु असतांना हा प्रकार उघडकीस आला असून शाळेतील शिक्षक कर्मचारी कॉपी करण्यास साहाय्य करत असल्याचा व्हिडिओ चक्क एका पालकानेच काढला होता. विशेष म्हणजे शाळा प्रशासनाने कॉपी करण्यासाठी यावेळी अनोखी शक्कल लढवत परीक्षा खोलीच्या बाजूला रिकाम्या खोलीत सर्व कॉपीचे साहित्य ठेवले असून आवश्यकतेनुसार एक एक विद्यार्थी आपन कोणाला दिसु नये या पद्धतीने तिथे जाऊन कॉपी घेऊन येत असल्याचा प्रकार समोर आला, तर याला खंड पडू नये म्हणून चक्क तिथे ह्या कॉपी च्या सुरक्षितेसाठी एक कर्मचारीच नियुक्त केलेला दिसत होता.
संबंधित बातम्या
SSC Exam : गोंदिया जिल्ह्यातील शाळेत 10 वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार; पालकाने काढला व्हिडिओ
SSC Exam : पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई : Varsha Gaikwad
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI