Sugarcane Farmers : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 12 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला मंजुरीची शक्यता
Good News For Sugarcane Farmers : नुकत्याच झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत साखर निर्यातीचा अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
Sugarcane Farmers : चालू हंगामात अंदाजापेक्षा साखर उत्पादन जास्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकार अतिरिक्त 1.2 दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी देऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार
हा अतिरिक्त निर्यात कोटा चालू 2021-22 हंगामासाठी आधी परवानगी दिलेल्या 10 दशलक्ष टन साखर निर्यातीपेक्षा जास्त असेल. नुकत्याच झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत साखर निर्यातीचा अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. साखर उत्पादनासाठी नोडल मंत्रालय म्हणून काम करणारे अन्न मंत्रालय अतिरिक्त कोटा वाटप करण्याच्या पद्धतींवर काम करत आहे. 2021-22 हंगामात देशाचे एकूण साखर उत्पादन 5 लाख टनांनी वाढून 36 दशलक्ष टन होईल. अपेक्षित आहे, जे आधीच्या 35.55 दशलक्ष टनांच्या अंदाजापेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
भारतीय साखरेची जागतिक मागणी कायम
साखरेच्या अतिरिक्त कोट्याच्या निर्यातीनंतरही देशात सुमारे 60 ते 68 लाख टनांचा ‘क्लोजिंग स्टॉक’ शिल्लक राहणार आहे. साखर कारखान्यांनी ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 या साखर हंगामात आतापर्यंत नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, संयुक्त अरब अमीरात (UAE),अफगाणिस्तान, इंडोनेशिया, सोमालिया आणि इतर देशांना 99.7 दशलक्ष टन साखर निर्यात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अलीकडे काही सुधारणा झाल्या आणि कच्च्या साखरेच्या किमतीत घसरण झाली असली, तरी भारतीय साखरेची जागतिक मागणी मजबूत राहिली आहे.
साखर निर्यातीच्या मर्यादेत 10 लाख टन सूट देण्याची मागणी
माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखर निर्यातीची मर्यादा 10 लाख टन शिथिल करण्याची विनंती केली होती. आधीच्या अंदाजापेक्षा साखरेचे उत्पादन जास्त असेल, असे ते म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या