Maharashtra Breaking News LIVE Updates: तोडगा न निघाल्यास एसटीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन, पोलिसांनी नागपुरातून बुलडाण्यात सोडलं, आंदोलनावर ठाम, प्रकृती बिघडली
नागपूर : काल नागपुरात रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ही अटक केली. कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर त्यांनी नागपुरात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला सुरू केलंय. मात्र, नागपुरातील तुपकरांच्या आंदोलनात 'हाय होल्टेज' नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. अटक केलेल्या तुपकरांना रातोरात पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना करण्यात आलं आहे. कापूस-सोयाबीन प्रश्नावर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होतय. सरकारने कोरोना आणि जमावबंदीचं कारण देत तुपकरांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीय. आंदोलनादरम्यान काल रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी तुपकरांना अटक करण्यात आली. प्रकृती खालावलेल्या तुपकरांना जबरदस्तीने उपचारांसाठी नागपुरात दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र, त्यांनी उपचारास स्पष्ट नकार देत आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलंय. अखेर सरकारने तुपकरांना रातोरात जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं.
T20I Rankings: टी 20 क्रमवारीत केएल राहुलची घसरण, कोण आहे नंबर वन...
ICC T20I Rankings: टी20 वर्ल्डकपनंतर (T20 WorldCup) पहिल्यांदाच आयसीसीने (ICC T20 Ranking) ने टी20 रॅकिंग जाहीर केली आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये धावा करणाऱ्या फलंदाजांना फायदा झाला आहे. मात्र, पहिल्या पाच खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) ची आयसीसी क्रमवारीत घसरण झाली आहे. तो सहाव्य़ा स्थानावर गेला आहे तर विराट कोहली (Virat Kohli) आठव्या स्थानावर कायम आहे. तर भारतीय टी 20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 15 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर घसरला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल तीन फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 839 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान दुसऱ्या तर एडन मार्करम तिसऱ्या स्थानावर आहे.
बळीराजा दुहेरी पेचात! इकडे आड, तिकडे विहिर; अवकाळी पाऊस त्यात महावितरणाची नोटीस
मुंबई : एकीकडे शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. अशात आता सरकार पण शेतकऱ्यांची परीक्षा घेतंय का?, असा सवाल विचारला जातोय. कारण एकीकडे राज्य शासनानं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देऊ केली. आणि आता महावितरणकडून शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही म्हणून सरसकट डीपी डिस्कनेक्ट केले जातायत. त्यामुळे पिकांना पाणी कसं द्यायचं, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहीलाय. त्यातच 3 एचपी मोटरसाठी 10 हजार तर 5 एचपी मोटरसाठी 15 हजार भरण्याचीही महावितरणकडून सक्ती केली जात असल्याचं बळीराजा सांगतोय.दरम्यान वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. राज्यात सर्वाधिक थकबाकी कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे आहे. हे ग्राहक वीजबिल भरतच नसल्याची ओरड सातत्याने केली जाते. राज्यात महावितरणच्या थकबाकीचा डोंगर सध्या खूप मोठा झाला आहे. ही अभूतपूर्व थकबाकी वसूल करण्याचे मोठे आवाहन महावितरणपुढे आहे. असे असले तरी लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. त्यात आता पिकांना पाणी देण्याच्या एचपी मोटरसाठी 10 ते 15 हजार भरण्याची सक्ती वीजबिल भरण्यासाठी महावितरणने केली आहे.
तोडगा न निघाल्यास एसटीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा न निघाल्यास एसटीचे खाजगीकरण करण्यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमरावती शहरात उद्या संचारबंदी शिथिलतेत बदल
उद्या अमरावती शहरातील जीवनावश्यक वस्तूची दुकानं आणि कृषी दुकान उघडण्याची वेळ सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 राहणार आहे. आधी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वेळ होती
परीक्षार्थींना परीक्षेसाठी संचारबंदीत सवलत कायम आहे. पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी हा आदेश दिला आहे. हा बदल एका दिवसासाठी आहे.
आटपाडी राडा प्रकरण: गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयानं फेटाळलाय. पडळकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय.
अकोला शहरातील जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश दोन दिवसांसाठी वाढविले
अकोला शहरातील जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश दोन दिवसांसाठी वाढविले. हे आदेश 21 नोव्हेंबर सकाळी 6 वाजेपर्यंत वाढवण्यात आले. त्यानुसार, संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार. तर, सकाळी 6 ते रात्री 7 दिवसा जमावबंदी असणार आहे.
ठाण्यात 500 स्केअर फुटापर्यंतच्या घरांना मिळणार कर माफी
ठाण्यात 500 स्के फुटापर्यंतच्या घरांना मिळणार कर माफी,ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व पक्षीयांच्या संमतीने निर्णय घेण्यात आला. 2017 साली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने दिलेले करमाफीचे आश्वासन दिले होते. गेल्या विधानसभेच्या शिवसेनेच्या वचनाम्यामध्ये हा मुख्य मुद्दा होता