Maharashtra Breaking News LIVE Updates : बुलढाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, पाहा आजची ताजी आकडेवारी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेले काही चेहरे शिवसेनेच्या तिकिटावर उत्तर प्रदेशात लढण्याची शक्यता
संजय राऊत राकेश टिकैत यांच्या मुजाफरनगर भेटीत याबाबत खलबतं
निवडणुकीत टिकैत उघडपणे राजकीय भूमिका घेण्याची शक्यता कमी, पण पडद्याआडून सूत्र हलवणार
शेतकरी आंदोलनात सक्रिय असलेली एक राजकीय संघटनाही शिवसेनेच्या संपर्कात
मुजफ्फरनगरनंतर संजय राऊत लवकरच लखनौ, मथुरेचाही दौरा करणार
पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीतील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आलय. दत्तात्रय वारे यांनी या निलंबनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची दत्तात्रय वारे यांची मागणी फेटाळून लावलीय आणि दत्तात्रय वांरेना 19 आणि 20 जानेवारीला चौकशी समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत.
राज्य मंत्री मंडळाने राज्यातील सर्व दुकानांवर आता मराठीत ठळक अक्षरांत नावं लिहीण्याचे आदेश जाहीर केलेत. मात्र या आदेशांना मुंबई ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा याने विरोध करत आदेशांचे पालन करणार नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट विरेन शहा याच्या मालकीच्या रूपम शाँप समोरच मोठे बँनर लावलेत. बँनर वर महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच
दहा कामगारांपैक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक
हे आपले ठाकरे सरकार
असा मजकूर छापण्यात आलांय. मुंबई पेलिस मुख्यलयासमोरच विरेन शहा यांच्या मालकीचे रूपम शाँप आहे. त्या शाँपच्या शेजारीच असे बँनर शिवसेनेनं लावलेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा दुकानांवर मराठी पाट्या लावण्यावरून वाद निर्माण होताना दिसतोय.
बीड जिल्ह्यातल्या गेवराईत एका व्यापार्याने आपल्या कारमध्ये ठेवलेले आठ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून लांबवल्याची घटना घडली आहे.. गेवराई मध्ये राहणारे भीमा नरोटे हे कापसाचा व्यवसाय करतात आपल्या व्यवसायातून आलेले पैसे त्यांनी आपल्या गाडीत ठेवले होते व ते आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सेवालाल नगरमध्ये आले असता अज्ञात चोरट्यांनी या गाडीच्या काचा फोडून हे आठ लाख रुपये लांबवले आहेत याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत
बुलढाण्यातआज कोरोनाबाधित रुग्णामध्ये वाढ झालीय. आज जिल्ह्यात 188 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, आजपर्यंत कोरोनामुळं 676 रुग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 498 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वाशिम जिल्ह्यात आज 71 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय. ज्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 41 हजार 180 वर पोहचलीय. जिल्ह्यात सध्या 184 रुग्ण सक्रीय आहेत.
बिकानेर एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरले. बंगालच्या जलपाईगुडी येथे दुर्घटना झाली असून दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गुवाहटीला जाणाऱ्या बिकानेर एक्स्प्रेसला दुर्घटना झाली आहे.
मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे विजयी, भाजपचे प्रसाद लाड पराभूत.
११ विरूद्ध ९ मतांनी सिद्धार्थ कांबळे यांचा विजय...
मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे विजयी. भाजपचे प्रसाद लाड पराभूत. सिद्धार्थ कांबळे 11 विरूद्ध 9 मतांनी विजयी झाले आहेत.
मुंबई जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष पद निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
पंतप्रधानांच्या बैठकीसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव प्रदीप व्यास, सिताराम कुंटे, मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून व्हिडिओ काॅन्फरन्सींगद्वारे ते उपस्थित आहे.
मुंबै बँक अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे आणि भाजपकडून प्रसाद लाड यांनी अर्ज भरला आहे.
तर उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर तर भाजपकडून विठ्ठल भोसले यांचा अर्ज दाखल.
थोड्याच वेळात होणार निवडणूक.
विरोधी पक्षनेते व सध्याचे बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी स्वत: अर्ज न भरता प्रसाद लाड यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला.
गेली सात वर्षे प्रविण दरेकर बँकेचे अध्यक्ष आहेत
मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदावरुन भाजपच्या प्रविण दरेकरांना धक्का देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र व्यूहरचना आखली आहे. भाजपकडे 9 तर शिवसेना-राष्ट्रवादीकडे 11 सदस्य आहेत. बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूकीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात निकाल अपेक्षित आहे.
मुंबै बँकेत भाजपला हादरा ?
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणार
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अखेर ठरलं.
मुंबै बँकेत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी सह्याद्रीवर खलबतं.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संचालक हजर...
महाविकास आघाडीकडे ११ संचालक तर भाजपकडे ९ संचालक.
आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील हायकोर्टातील सुनावणी पूर्ण
सोमवारी मुंबई उच्च न्यायालय सुनावणार आपला फैसला
निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सवाई गंधर्व संगीत महोत्सव रद्द करण्याचा निर्णय. 6 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे. "विधानभवनाच्या पायऱ्यांवर घडलेल्या 'म्याँव म्याँव' नाट्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा याचिकाकर्त्यांचा दावा चुकीचा, ही घटना त्याच्या काही दिवस आधी 21 डिसेंबरला घडली होती, त्याच्या चौकशीसाठी आरोपींना नोटीस पाठवनू त्यांची चौकशीही करण्यात आली आहे.", अशी माहिती सुनावणी दरम्यान, राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे.
एम पी एस सी कडून गट क, दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी पदासाठी घेण्यात येणार्या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी तात्काळ मुदतवाढ देण्याचा निर्णय. आता विद्यार्थी 17 जानेवारीपर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करु शकणार. ज्या वेबसाईटवर या परीक्षांसाठी अर्ज दाखल करायचे होते ती वेबसाईट आठ जानेवारीपासून बंद झाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते. एबीपी माझाने ही बाब समोर आणल्यावर आयोगाकडून याची लागलीच दखल घेत 17 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारणीला हिरवा कंदील
राज्य सरकार महाराष्ट्र भवन उभारणार - अजित पवार
भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक
सिडकोने महाराष्ट्र भवनास 1 ₹ नाममात्र दराने भूखंड द्यावा
मंदा म्हात्रे यांनी अजित पवारांकडे केली मागणी
4 वर्षांपासून महाराष्ट्र भवनाची प्रक्रिया रखडलीय
नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी सुरू
सहआरोपी मनिष दळवी यांच्या अटकपूर्व जामीनावर युक्तिवाद सुरू
दळवी हे जिल्हा बँकेवर निवडून आलेले विद्यमान अध्यक्ष आहेत
मात्र परब यांच्या कथित मारहाण प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेपासून कोणतंही संरक्षण नसल्यानं अडचणीत
याप्रकरणी अटकेपासून तातडीचा दिलासा मिळवण्यासाठी मनिष दळवी हायकोर्टात
मनिष दळवी यांच्यावतीनं जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांच्या युक्तिवाद सुरू
रस्त्याने जात असताना मोटारसायकल स्वाराचा गळा चिरला, नायलॉन मांजाने गळा चिरला , येवला शहरातून अंगणगावच्या दिशेने जात असताना घडली घटना
मोटारसायकल स्वाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल,
येवला शहरात आज पासून तीन दिवस असतो पतंग उत्सव
पहिल्याच दिवशी नायलॉन मांजाने एक जण जखमी
आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकरांनी आपापसातले वाद सामंजस्यानं मिटवायला हवेत - हायकोर्ट
भाजप आमदार आणि महापौर दोघेही प्रतिष्ठीत आणि एक जबाबदार पुढारी आहेत - हायकोर्ट
मुंबई उच्च न्यायालयाकडनं प्रतिवादींना नोटीस जारी
महापौर आणि राज्य सरकारला दोन आठवड्यांत भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलारांची हायकोर्टात धाव
महापौरांबाबत अपानास्पद वक्तव्य दाखल केल्याप्रकरणी दाखल गुन्हा
सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी भाजपकडून अध्यक्षपदासाठी मनीष दळवी तर उपाध्यक्ष पदासाठी अतुल काळसेकर, महाविकास आघाडी कडून अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डॉन्टस व उपाध्यक्ष पदासाठी विद्याप्रसाद बांदेकर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक भरला, निर्णय अधिकारी वंदना खरमळे यांच्याकडे अर्ज सादर , पक्षीय बलाबल भाजप ११ तर महाविकास आघाडी ८ अश्या एकूण १९ जागा आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील मुख्यमंत्र्यांशी संध्याकाळी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे कोविड 19 संसर्ग प्रतिबंधासंदर्भात चर्चा करणार आहेत. या ऑनलाईन बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत ऑनलाईन बैठकली उपस्थित रहाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला का उपस्थित राहणार नाहीत. या संदर्भात कोणतीही अधिकृत माहीती देण्यात आलेली नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.
छगन भुजबळांसह कुटुंबियांच्या निर्दोष मुक्ततेला हायकोर्टात आव्हान,
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका.
तक्रारदार अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित.
याच प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या विकासक चमणकर यांच्यातर्फे अंजली दमानियांविरोधात मानहानीचा दावा
सोन्याची लंका म्हणून जिचा उल्लेख होतो त्या श्रीलंकेत महागाईनं हाहाकार उडाला आहे. तिथं भाजीपाला सोन्याच्या भावानं विकला जातोय. तिथं एक किलो बटाट्यासाठी 200 रुपये तर मिरचीसाठी 700 रुपये मोजावे लागताहेत. महागाईनं लोक इतके बेजार झालेत की त्यांना अक्षरशः पोटाला चिमटे काढावे लागताहेत. हे संकट इतकं मोठं आहे की श्रीलंकेत आणीबाणी लावावी लागलीय. डिसेंबरमध्ये महागाई तब्बल 22 टक्क्यांनी वाढली आहे आणि इतिहासातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या संकाटानं आपला शेजारी देश दिवाळखोर बनला आहे.
श्रीलंकेत महागाईनं कहर केला असताना भारतातही महागाईनं गेल्या सहा महिन्यांतला रेकॉर्ड मोडलाय. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर सहा महिन्यांतले रेकॉर्ड मोडून 5.59 टक्क्यांवर पोहोचला. रिझर्व्ह बँकेनं वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही महागाई वाढली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं बुधवारी जाहीर केलेल्या महागाईच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यातील 4.91 टक्के वाढीच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ही वाढ 5.59 टक्क्यांवर पोहोचली. अन्नधान्यांच्या दरवाढीमुळे डिसेंबरमध्ये महागाई वाढलीय.
नंदुरबार:- नवापूर येथील विजय इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला आणि गोडाऊनला भीषण आग...आगीचे कारण अजून गुलदस्त्यात..नवापूर ,नंदुरबार, सोनगड अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल....आगीवर नियत्रंण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.....परिसरात कुलिंग ऑपरेशन सुरू...आग विझवण्यासाठी गेलेला अग्निशामक दलाचा एक जवान जखमी....
महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा आकडा मोठा आहे, मात्र रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण कमी असल्यानं महाराष्ट्रात लॉकडाऊनची गरज नाही. अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधानांसमोर मांडणार आहेत. ओमायक्रॉनचा संसर्ग आणि कोरोनाचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. सध्या महाराष्ट्रात दररोज 30 ते 40 हजार कोरोनाबाधित आढळतायेत. मात्र राज्यात उपलब्ध ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्स आणि रुग्णालयात दाखल होण्याची संख्या बघता सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात असल्याची राज्याची भूमिका आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थिती लावणार आहेत.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर दिसू लागलाय. देशात काल एका दिवसात आजवरची सर्वाधिक म्हणजे तब्बल अडीच लाखांवर रुग्णांची वाढ झाली आणि 203 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातही महाराष्ट्रात काल वाढलेली रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यात काल 46 हजार 723 नवे रुग्ण आढळले. राज्यात चार महिन्यांत रुग्णसंख्या तिपटीनं वाढली. असं असलं तरी मृत्यू दरात मात्र घट दिसून आली ही दिलासादायक बाब आहे. तर गेले काही दिवस मुंबईत घटत असलेली रुग्णसंख्या काल पुन्हा वाढली. मुंबईत काल 16 हजार 420 रुग्ण वाढले, तर 7 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत काल 916 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत.
राज्यात सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. मात्र त्यानंतर याची अंमलबजावणी होत नव्हती. तसेच छोटे दुकानदार यातून अनेक पळवाटा शोधायचे. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असायचं. मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असायची. आता मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे इंग्रजी किंवा अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Goa Election 2022 : आगामी काळात पाच राज्याच्या निवडणुका (Assemnbly Election 2022) होऊ घातल्या आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) तयारी सुरु केली आहे. शिवसेना (Shiv Sena) गोव्यासह उत्तरप्रदेशमध्ये निवडणुक लढण्याच्या तयारीत आहेत पण शिवसेनेला आतापर्यंत फारसं यश आलं नाहीय.आता शिवसेना काय तयारी करत आहे? कशी निवडणुक लढवणार? याबद्दलची सर्वांनाच उत्सुकता आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवण्यासाठी प्रयत्न केले पण अद्याप त्यांना यश आले नाही, गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जमवून घ्यायला तयार नाहीय तर दुसरीकडे काँग्रेसला शिवसेनेबद्दल सॅाफ्ट कॅार्नर दिसतोय. कारण गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा शिवसेनेला सोबत घेण्यात इच्छुक असल्याची माहिती मिळतेय. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रावादीनं प्रत्येकी 4-4 जागा मागितल्या होत्या त्यापैकी शिवसेनेला 3 जागा मिळत असल्याची माहिती आहे. पण हिंदुत्त्ववादी विचारसरणी असलेली शिवसेना 3 जागांसाठी गोव्यात काँग्रेससोबत जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार असल्यानं गोव्यातही सेम फॅार्म्युला वापरायचा होता पण कॅाग्रेसनं राष्ट्रवादीला जागा न दिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन प्रादेशिक पक्ष गोव्यात एकत्र येऊ शकतात.
Nagpur Crime News : नागपूर रेल्वेला मोठा चुना लावणारा अटकेत; एक, दोन नव्हे तब्बल 55 नळ जप्त
Nagpur Railway Crime : रेल्वे गाडीच्या स्वच्छतागृहात गेल्यावर नळाची तोटी नसल्यानं पाईपमधून वाहतं पाणी पाहून आपण रेल्वे प्रशासनासह सरकारला पोटभरून शिव्या देतो. मात्र, नागपुरात रेल्वेतील नळाच्या तोट्या गायब असल्यामागे सरकार नव्हे तर तुमच्या आमच्यातले काही सिकंदर कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वे गाडीच्या स्वच्छतागृहातून नालाच्या तोट्या चोरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 55 नळ जप्त केले असून त्याने आजवर शेकडो नळ चोरून रेल्वेला मोठा चूना लावल्याची माहिती समोर आली आहे.
आधी चोर फक्त सोने चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरायचे. मात्र, आता आपल्या वाईट सवयी भागवण्यासाठी नवखे चोर मिळेल ती वस्तू लंपास करतात. त्यामुळे अंमली पदार्थांची सवय असलेले चोर कधी काय आणि कोणती वस्तू चोरतील याचा नेम नाही. अशाच एका चोराला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या चोराने चक्क रेल्वे गाडीतील नळ चोरले होते. सिकंदर जहीर खान असे त्याचे नाव असून सिकंदर नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एक्सप्रेस गाड्यांच्या स्लीपर कोचच्या स्वच्छतागृहातील नळ तोट्या चोरी करायचा. चोरलेल्या नळ तोट्या विकून मिळणाऱ्या पैशातून सिकंदर त्याचे अमली पदार्थांचे व्यसन पूर्ण करायचा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -