Maharashtra Breaking News LIVE Updates: आरोग्य भरती आणि टीईटी पेपर फोडणारे शिक्षक निलंबित, आरोपी सध्या सायबर पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Booster Dose : आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर'
Maharashtra Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. तसेच आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास देखील सुरुवात होत आहे. देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मा त्या पार्श्वभूमीवर अनेक देशात बूस्टर डोस देण्यात येत आहे. आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आज, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी 44 हजार 388 रुग्णांची नोंद
मुंबई : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
Mumbai Police : मुंबई पोलिस दलामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव; अनेक बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी बाधित
Mumbai Police Corona Update : राज्यातील अनेक नेतेमंडळींना कोरोनानं गाठल्यानंतर मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली. मुंबईकरांसाठी ऑन ड्यूटी 24 तास असलेल्या पोलिसांनाही आता मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस दलातील एकूण 18 बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तांसोबत चार अप्पर पोलीस आयुक्त आणि तेरा पोलीस उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. सोबतच मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे.
परभणीत 68 नवे कोरोनाबाधित
परभणी जिल्ह्यात 24 तासांत 68 नवे कोरोनाबाधित आढळले असून 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 272 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
आरोग्य भरती आणि टीईटी पेपर फोडणारे शिक्षक निलंबित
आरोग्य भरती आणि टीईटी पेपर फोडण्यात थेट सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांकडून अटकेची कारवाई झालेल्या प्रल्हाद नागरगोजे आणि विजय नागरगोजे या दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्यांच्या तक्रारीची धनंजय मुंडे यांनी घेतली दखल
अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी आपल्यावर बिलांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याबाबत केलेल्या तक्रारीची जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली असून या प्रकरणी श्री कोकणे यांना पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली आहे.
700 मेट्रिक टन ऑक्सिजन गरज लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागणार- मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
राज्यात सध्या 508 ऑक्सिजन लागत आहे. मात्र, ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, तेव्हा राज्यात लॉकडाऊन लावला जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली. तसेच नागरिकांना तातडीनं लसीकरण करून घ्यावं, असंही त्यांनी आवाहन केलंय.
औरंगाबादेत कोरोनामुळे 1980 लोकांचा मृत्यू, आर्थिक मदतीसाठी 5,340 अर्ज
औरंगाबाद मनपा अंतर्गत राहणाऱ्या लोकांचा कोरोनामुळे 1980लोकांचा मृत्यू झाला आहे तर शासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत जाहीर केल्यानंतर औरंगाबादमध्ये 5 हजार 340 नातेवाईकांनी मदतीसाठी अर्ज केले आहेत. 3660 लोकांनी औरंगाबादमध्ये मृत्यू झालेल्या लोकांपेक्षा अधिक अर्ज केले आहेत.