Maharashtra Breaking News LIVE Updates : मुंबई पोलीस दलातील 18 बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Covid 19 India Cases : गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 632 नवे कोरोनाबाधित
Covid 19 India Cases : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासात 327 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोरील आव्हान दिवसागणिक वाढत आहे.
देशात सध्या एकूण 5 लाख 90 हजार 611 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात 3 कोटी 44 लाख 53 हजार 603 कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाबळींची संख्या 4 लाख 83 हजार 790 इतकी झाली आहे. सध्या रुग्णावाढीचा दर 10.21 आहे.
दुसरीकडे, देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या देखील वाढत असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढून 3623 झाली आहे. 28 राज्यांमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट पसरला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 1009 रुग्ण आढळले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली 513 रुग्ण आणि कर्नाटकमध्ये 441 रुग्णांची नोंद झाली आहे.
आतापर्यंत 151 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 151 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी 89 लाख 28 हजार 316 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 151 कोटी 57 लाख 60 हजार 645 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील 91 टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 66 टक्के लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात, 15-17 वयोगटातील 22 टक्के किशोरांना अँटी-कोविड-19 लसींचा पहिला डोस मिळाला आहे.
राज्यात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झालाय असं तज्ञांचं मत असून कोरोनाचे आकडे भयंकर पद्धतीनं वाढत आहेत. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर काल (शनिवारी) कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
काय आहेत नियम?
- रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.
- राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
- अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध
- सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक
- प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही
- लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी
- अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
- सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
- 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
- स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
- हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार
- पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
- शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू
- रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे
- नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.
- नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी 8 सिनेमागृहा बंद
मुंबई पोलीस दलातील 18 बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव, 18 बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण. सह पोलीस आयुक्तांसह चार अप्पर पोलीस आयुक्त आणि तेरा पोलीस उपायुक्तांना कोरोनाचा संसर्ग
नव्या नियमावलींचा व्याघ्र प्रकल्पांनाही फटका
महाराष्ट्रातील पर्यटनस्थळ उद्यापासून संपूर्णपणे बंद होणार आहे. नव्या नियमावलीमुळे व्याघ्र प्रकल्पांनाही फटका बसला आहे. मंगळवारपासून पेंच व्याघ्र प्रकल्प, नावेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प बंद होणार आहे. उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य देखील मंगळवारपासून बंद होणार आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 4029 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 688 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 4029 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 688 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 502018 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एका कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 14890 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 18012 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
कोल्हापूर : साडे पाच लाख रूपयांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्यासह सरपंच लाचलुचपतच्या जाळ्यात
साडे पाच लाख रूपयांची लाच घेताना प्रांत अधिकाऱ्यासह सरपंचाला रंगेहात पकडलं. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. राधानगरीचे प्रांत अधिकारी प्रसेनजित प्रधान यांच्यासह फराळे गावचे सरपंच संदीप ढवण लाचलुचपतच्या जाळ्यात.
सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वरांच्या यात्रेवर प्रशासकडून निर्बंध, यात्रेसाठी प्रशासनाकडून केवळ 50 लोकांनाच परवानगी
सोलापूरचे ग्रामदैवत सिध्दरामेश्वरांच्या यात्रेवर प्रशासकडून निर्बंध
यात्रेसाठी प्रशासनाकडून केवळ 50 लोकांनाच परवानगी
ग्रामदैवत श्री. सिध्देश्वर यात्रेला 900 वर्षांची परंपरा
यात्रेतील तैलाभिषेकासाठी सात नंदीध्वजाची पायी मिरवणूक यंदा देखील नाही, वाहनातून नेले जातील नंदीध्वज
संमती कट्ट्यावरील विवाह सोहळ्याला देखील केवळ 50 लोकांनाच परवानगी, दोन डोस असणे गरजेचे
शोभेचे दारूकाम तसेच सुगडी पूजनाला परवानगी नाही
12 ते 16 जानेवारीदरम्यान होणार आहे सिध्दरामेश्वरांची यात्रा, जवळपास 900 वर्षांची यात्रेची परंपरा
सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आदेश