Maharashtra Breaking News LIVE Updates : गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलारांची हायकोर्टात धाव
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं शोक; कोण असतील देशाचे पुढचे सीडीएस?
CDS Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळं संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली होती. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशातील सैन्याच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निधनानंतर आता चर्चा सुरु झाली आहे की, देशाचे पुढचे सीडीएस कोण? सेवाज्येष्ठतेचा विचार करता जनरल एमएम नरवणे(Manoj Naravane) हे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. तिनही सेना प्रमुखांमधून सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तीची या पदासाठी निवड केली जाऊ शकते. अशातच नौदलाचे अधिकारी एडमिरल करमवीर सिंह सर्वात ज्युनिअर आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे आहेत. जर या दोघांमध्ये अनुभव आणि सेवाज्येष्ठतेचा विचार केला तर, एमएम नरवणे हेच या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दिसत आहे. नरवणे हे 60 वर्षांचे आहेत. जनरल बिपिन रावत यांच्यानंतर त्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नरवणे हे युद्धनितीतील सर्वात मोठे जाणकारही आहेत.
'हेलिकॉप्टर ढगात सापडलं, पायलटही घाबरला, मग मी त्याला सांगितलं...' शरद पवारांनी सांगितला किस्सा
कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरांतून सीडीएस जनरल रावत यांच्यासह मृत्यू पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवाय या घटनेनंतर याआधीच्या काही घटनांवर देखील बोललं जात आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो.
'त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा आल्या. वाऱ्याचा वेगही जास्त होता. ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं.'
गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलारांची हायकोर्टात धाव
महापौरांबाबत अपानास्पद वक्तव्य दाखल केल्याप्रकरणी दाखल गुन्हा
मरिन लाईन्स पोलीस स्थानकांत हजेरी लावत शेलारांनी मिळवला नियमित जामीन
नाशिक मनपा हद्दीतील पहिली ते सातवीच्या शाळा 13 डिसेंबरपासून सुरू होणार
नाशिक मनपा हद्दीतील 1 ते 7 वी च्या शाळा 13 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने निर्णय घेतला. 10 डिसेंबरपर्यंत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची काय स्थिति आहे ते बघून निर्णय घेण्याचे मनपा आयुक्तांनी जाहीर केले होते. त्यानुसार सर्व नियम पाळून शाळा सुरू होणार आहे.
भाजप नेते आशिष शेलार दिल्लीला रवाना, हिवाळी अधिवेशनापूर्वी बारा आमदारांचे निलंबन रद्द व्हावं यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू
भाजप नेते आशिष शेलार दिल्लीला रवाना झाले आहे. 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रकरणात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी बारा आमदारांचे निलंबन रद्द व्हावं यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत
चर्चगेट स्टेशन गेट नंबर 3 जवळ आग
चर्गगेट स्टेशनच्या गेट नंबर 3 जवळ, आहिल्याबाई होळकर चौकासमोर आग लागली आहे. जवळ असलेल्या कचऱ्याला आग लागल्यानंतर ही आग पसरल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.
39 दिवसानंतर भंडारा आगारातून निघाली बस
भंडारा विभागातील साकोली आगारानंतर भंडारा आगाराने धाडसी निर्णय घेत आपली बस सेवा सुरु केली आहे. भंडारा आगारातून दोन बस सुटल्या आहे. मागील 39 दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ करण्यात आली असून सुद्धा एस कर्मचारी विलगिकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर काही आगारातील कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत