Maharashtra Breaking News LIVE Updates : नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेचे बंधन, दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
द्राक्ष उत्पादकांना विशेष पॅकेज द्या; तर कर्जमाफी आणि द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करा... राजू शेट्टीची मागणी
नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी दरम्यान बोलत होते. अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज,तासगाव,पलूस,जत,कवठेमहांका
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind) आज एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर (Raigad Fort) आहेत. राष्ट्रपती हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. मात्र याला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपतींच्या खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली होतीॉ. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, "राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे."
Omicron Variant : दिलासादायक! ओमायक्रॉन इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक नाही... 'या' देशाची माहिती
Omicron Variant : जगभरात ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट चिंतेचा विषय बनला असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या (Corona) इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं (Singapore Health Ministry) दिली आहे. याबाबत अधिक निष्कर्षासाठी आणि व्हेरिएंटची संरचना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असण्याचे किंवा या व्हेरिएंटवर सध्याची कोविड लस प्रभावी नसल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. 'चॅनल न्यूज एशिया' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मंत्रालयानं सांगितलं की, ओमायक्रॉनबद्दल अधिक माहिती आणि अभ्यास आवश्यक आहे. येत्या आठवड्यात जागतिक स्तरावर आणखी माहिती समोर येईल.
सांगली जिल्हा बँकेत प्रथमच महिला संचालक
सांगली जिल्हा बँकेत प्रथमच महिला संचालकाची निवड झाली आहे. यावेळी अध्यक्षपदी आ. मानसिंगराव नाईक, तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचं निधन
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचं निधन झालं आहे. यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त असणारे गोडसे मागील 2 आठवड्यांपासून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. ते 65 वर्षांचे होते.
मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव, दोन जण बाधित
मुंबईमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केलाय. दोन रुग्णांना नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे.
नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेचे बंधन, दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
नगर अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने बंधनं घातलं असून ठेवीदारांना दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.
ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ यांचा भाजपवर घणाघात
ओबीसी आरक्षण मुद्द्यांवरुन छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणात अडचणी का येत आहेत? हे कळत नाही, हे सर्व एक राजकीय षडयंत्र असल्याचंही भुजबळ म्हणाले. तसंच या सर्वांवर मी फडणवीसांशी फोनवर बोलणार आसल्याचंही भुजबळांनी सांगितलं.