Maharashtra Breaking News LIVE Updates : गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केला कालिचरण बाबावर गुन्हा

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 29 Dec 2021 06:11 PM
नांदेड एसटी महामंडळ आगारातील कर्मचाऱ्यांची ईच्छा मरणाची मागणी

गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणा साठी कामबंद आंदोलन पुकारलेय. तर या आंदोलना दरम्यान जवळपास 60 जणांचा जीव गेलाय. तर नांदेड आगारातील दोन  एसटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून मृत्यूला कवटाळलेय. आज नांदेड एसटी आगारातील 120 कर्मचाऱ्यांनी आपल्या सहीनिशी जिल्हाधिकाऱ्या मार्फत राज्य सरकारला निवेदन देऊन ईच्छा मरणाची परवानगी मागितलीय.गेल्या दोन महिन्यांपासून एसटी आंदोलन चालू असून सरकार  विलीनीकरणही करत नाही व ठोस निर्णय घेत नाही. असा आरोप करत, आपल्या कुटुंबावर आंदोलनामुळे आर्थिक चणचण निर्माण होऊन उपासमारीची वेळ आल्याचे सांगत मरणाची परवानगी मगितलीय.

भिवंडीत एकाच कुटुंबातील 4 जण ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले

भिवंडी महापालिका क्षेत्रात  गैबीनगर परिसरात कतार देशातून आलेला २२ वर्षीय तरुण पहिला ओमायक्रोनचा  विषाणू बाधित रुग्ण  आढळला होता. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीत कोविड-१९ या विषाणूची दुसरी लाट ओसरत असताना  विषाणूचे रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने पालिका  आरोग्य विभागाच्या वतीने ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास करून भिवंडीत आलेल्या व्यक्तींसह त्यांच्या निकटवर्ती नातेवाईकांचा   शोधून त्यांची कोविड चाचणी(आर.टी.पी.सी.आर) करण्यात येत आहे. यामध्ये कतारहुन आलेल्या रुग्णांच्या तीन नातेवाईकांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे आज समोर आले आहे.  कतारहुन आलेल्या रुग्णांच्या तीन नातेवाईकांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे आढळून आल्याने  त्या तिन्ही रुग्नांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे  कतार येथून आलेल्या  ओमायक्रोनच्या पहिल्या रुग्णाचे कोविडचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याने बाधित रुग्णास कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. परंतु नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरीतील रँडम तपासणीत पहिल्यांदाच ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चार ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे एक रुग्ण रँडम तपासात आढळला आहे. यात 2 पुरुष, 1 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. यातील एक जपान, एक थायलंड आणि एक दक्षिण आफ्रिकेतून आलाय. तर एक रुग्ण रँडम तपासात आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत शहरात ओमायक्रॉनचे 22 रुग्ण आढळलेत पैकी 13 रुग्ण निगेटिव्ह झालेले आहेत.

पिंपरीतील रँडम तपासणीत पहिल्यांदाच ओमयक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चार ओमयक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे एक रुग्ण रँडम तपासात आढळला आहे. यात 2 पुरुष, 1 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. यातील एक जपान, एक थायलंड आणि एक दक्षिण आफ्रिकेतून आलाय. तर एक रुग्ण रँडम तपासात आढळल्याने चिंता व्यक्त केली जातीये. आत्तापर्यंत शहरात ओमयक्रोनचे 22 रुग्ण आढळलेत पैकी 13 रुग्ण निगेटिव्ह झालेले आहेत.

बापाने केला १५ वर्षीय मुलीवर बलात्कार

सदर आरोपींना पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती कमला बोरा यांचे समोर हजर केले असता  सरकारी वकिलांनी ७ दिवस पोलिस कस्टडी मागितली होती परंतु आरोपी चे वकील ॲड. किर्तीपाल सर्वगोड यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सदर आरोपींना मे. कोर्टाने ५ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करत आहेत. आरोपी तर्फे ॲड. किर्तीपाल सर्वगोड, ॲड. राहुल भोसले व सरकार तर्फे सरकारी वकील ॲड.सारंग वांगीकर यांनी काम पाहिले. पिडीताने मुलीला जन्म दिला आहे. सध्या पीडित सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केला कालिचरण बाबावर गुन्हा

महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी  करणारा तथाकथित संत कालिचरण याच्यावर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेमध्ये तथाकथित संत कालिचरण याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण केले होते. त्यामुळे देशभर संताप व्यक्त केला जात आहे. ही टीका करून कालिचरण याने देशवासियांचा अवमान केला आहे. त्याबद्दल डाॅ.जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धडक दिली. तसेच कालिचरण यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. ही विधाने करीत असताना त्याने आपल्या विधानाचेही समर्थन करत, आपल्या वाटेत येणाऱ्या लोकांना कापून टाकण्याची धमकी दिली आहे. या आधीही कालिचरण बाबाने धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे केली आहेत. त्यामुळेच आपण नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन कालिचरण बाबांबरोबर भादंवि  294, 295(अ), 298, 505(2), 506, आणि 34 ( 34) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फॅसिझमच्या   विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. त्यामुळेच आपण स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. ही विचारांची लढाई आहे आणि आपण ही लढाई लढणार आहोत, असे आव्हाड यांनी सांगितले. 

2 जानेवारीला मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा मेगा ब्लॉक

2 जानेवारीला मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. पाचव्या सहाव्या मार्गिगेसाठी हा 24 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 
ठाणे ते कल्याण मार्गावर धीम्या मार्गावर अप आणि डाऊन दिशेला एकही लोकल धावणार नाही. दरम्यान 200 लोकलच्या फेऱ्या रद्द होणार आहेत. तर शनिवार, रविवार आणि सोमवारी मिळून 18 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री नंतर 2 वाजता हा मेगा ब्लॉक सुरू होईल तर रविवारी रात्री 2 वाजता संपेल. सोमवारी सकाळी सर्व गाड्या सुरू होतील. ब्लॉक दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर एकही लोकल उपलब्ध नसेल. ब्लॉक नंतर कळवा आणि मुंब्रा दरम्यान नवीन बांधलेल्या खाडी पुलावरून धीम्या लोकल धावतील. 

नागपुरात 31 डिसेंबरला होणाऱ्या पार्टीवर बंदी, नागपूर जिल्हाप्रशासनाचा निर्णय

वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात 31 डिसेंबरला होणाऱ्या पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर जिल्हाप्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 


 





नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. कोर्टातला आजचा युक्तिवाद संपला आहे, 

मुंबईच्या दहिसर येथील एसबीआय बँकेत भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू

मुंबईच्या दहिसर पश्चिमेत एसबीआय बँकेत आज दुपारी भर दिवसात झालेल्या गोळीबारात बँकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.


 

जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या ओमायक्रॉनची कोल्हापुरात ओमायक्रॉनची बुधवारी एन्ट्री

आज दुपारी ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण कोल्हापुरात सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आयटीआय परिसरातील एका कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोना झाल्याने उपचारासाठी दोघांना दाखल करण्यात आले होते. चार पैकी तिघांचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. यामध्ये एका रुग्णाला ओमायक्रोन झाल्याचे स्पष्ट झाले.

गुन्हेगारांना पकडायला वेळ नाही, पण राणेंच्या घरी नोटीस पाठवायला वेळ आहे. - देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून आमदार नितेश राणे यांच्याबाबतची माहिती देण्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं असून, याचा भाजप निषेध करत असून आम्ही राणेंच्या पाठीशी उभे आहोत असं म्हणत गुन्हेगारांना पकडायला वेळ नाही, पण राणेंच्या घरी नोटीस पाठवायला वेळ आहे. असंही फडणवीस म्हणाले.

शरद पवार आणि संजय राऊत यांनी अनेकांना बेरोजगार केले, राणे हे त्यातले; अनिल गोटेंचा टोला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जर नितेश राणे यांच्याबाबत माहिती असेल तर त्यांनी पोलिसांनी सहकार्य करायला हवे, राणे यांना नोटीस बजावली असेल तर काही गैर नाही असं राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे म्हणाले. शरद पवार आणि संजय राऊत यांनी अनेकांना बेरोजगार केले, राणे  हे त्यातले, ते आता रोजगार शोधत आहेत असा टोला अनिल गोटे यांनी लगावला आहे. 

हिंगोलीत ट्रक आणि लक्झरीचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

हिंगोली ते नांदेड रोडवरील पार्डी मोड ट्रक आणि लक्झरीचा अपघाच झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून  20 ते 25 जण गंभीर जखमी आहे, पोलीस प्रशासनास आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आबे.  लक्झरी  आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात अनेक  जण ट्रक खाली दबल्याची  माहिती समोर येत आहे. क्रेन आणि जेसीबीच्या साह्याने ट्रकला हलविण्याचे काम सुरू आहे. 

नितेश राणे यांच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी सुरु

नितेश राणे यांच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. न्यायालयात युक्तीवाद सुरु झाला आहे.

कोर्टाच्या नोटिशीबाबत बोलणार नाही, नारायण राणे यांची प्रतिक्रिया

कोर्टात हजर राहण्याबाबत दिलेल्या नोटिसीवर बोलायचे नसल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले. 

सिंधुदुर्ग:  केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलीस स्थानकात हजर राहण्याची नोटीस

सिंधुदुर्ग:  केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलीस स्थानकात हजर राहण्याची नोटीस, नितेश राणे यांच्या वास्तव्याबाबत केलेल्या विधानावरून पोलिसांची नोटीस

राज्यपालांवर केंद्राचा दबाव आहे का? हे राज्यपालांनी सांगावं; शिवसेना नेते संजय राऊत यांचे आवाहन

राज्यपालांवर केंद्राचा दबाव आहे का? हे राज्यपालांनी सांगावं असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आवाहन केले. महाराष्ट्रात राज्यपालांचा अनादर व्हावं असं कृत्य झालं नाही असेही त्यांनी म्हटले. 


 
महाड येथील महिला सरपंच हत्या प्रकरणी सात संशयित ताब्यात; चौकशी सुरू..

महाड येथील महिला सरपंच हत्या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आदिसतें गावच्या महिला सरपंच मिनाक्षी खिडबीडे यांची गेल्या दोन दिवसांपूर्वी हत्या झाली होती. हत्येप्रकरणी पोलीसांचे दहा पथक तयार करण्यात आले आहेत.आदिसते गावाजवळच्या जंगल भागात मिनाक्षी खिडबीडे यांचा मृतदेह आढळला होता.

ओमायक्रॉन आणि मुंबईतल्या वाढत्या कोरोना रूग्णसंख्येसंदर्भात चर्चा करण्यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरेंची महत्वाची बैठक

ओमायक्रॉन आणि मुंबईतल्या वाढत्या कोरोना रूग्णसंख्येसंदर्भात चर्चा करण्यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरेंची महत्वाची बैठक आज होणार आहे. महापालिका मुख्यायलयात दुपारी 1 वाजता आदित्य ठाकरे आणि पालिका अधिका-यांची बैठक होणार आहे. लसीकरण आणि टेस्टींग वाढवण्याबरोबरच निर्बंधाबाबत  चर्चा होणार आहे.ऑक्सीजन पुरवठा, औषध साठा याचा आढावा घेण्याबरोबरच जम्बो कोवीड सेंटर्स पुन्हा सज्ज करण्याविषयी बैठकीत चर्चा होणार आहे.दुस-या लाटेच्या तुलनेत रूग्णसंख्या वाढीचा वेग जास्त असल्यानं अधिकाधिक रूग्णांना रूग्णालयात दाखल करायची वेळ आल्यास, त्यादृष्टीने काय नियोजन करता येईल हेदेखील पाहिले जाणार. या बेठकीला पालिका आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित असतील.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रावर राज्यपाल कोश्यारी नाराज,

विधानसभा अध्यक्ष निवडणूक:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रावर राज्यपाल कोश्यारी नाराज, पत्रातील भाषेवर राज्यपालांचा आक्षेप असल्याची माहिती

पुणे : कालीचरण महाराज आणि मिलिंद एकबोटे विरोधात गुन्हा दाखल, चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप

पुणे : कालीचरण महाराज आणि मिलिंद एकबोटे विरोधात गुन्हा दाखल, चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप

वातावरणीय बदलांमुळे ऋतुचक्र गडबडलं; विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस

वातावरणीय बदलांमुळे ऋतुचक्र गडबडल्याची प्रचिती पुन्हा एकदा राज्यात अनुभवायला मिळतेय. कालपासून विदर्भ आणि मराठवाड्याला मुसळधार पाऊस आणि गारपीटीनं झोडपलंय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर तालुक्यात जोरदार काल पाऊस झालाय. देवगाव, शनि चेंडूफळ, बाजाठाण, गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा, गंगापुर या भागात गारपीट ही पाहायला मिळाली. वाशिमच्या कारंजा तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू आहे..तर हरभरा, फळभाजी पिकांचं  नुकसान झालंय.अहमदनगर जिल्ह्यातही गारांचा पाऊस झाला. श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांसह बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली.हवामान विभागाने विदर्भात 2 दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातल्या वाढोना आणि मेंढला परिसरात पावसासह गारपीट झालीय. यामुळे संत्रा पिकाचं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांना पावसासह गारपिटीचा फटका बसला.  ऐन हिवाळ्यात आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलेय. शेतात असलेल्या हरभरा तसेच गव्हाच्या पीकांच नुकसान झालं आहे. संत्र्याच्या बागांनाही या पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय. सध्या तूर काढणीचा हंगाम आहे.. या पावसामुळे भाज्यांचंही मोठं नुकसान झालंय. 

देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ?

Coronavirus Update : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid-19 Update) वाढताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशातील मंदावलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉनबाधितांच्या (Omicron) संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. देशभरातील  21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे.  


देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव 


दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 496 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं. तसेच कोरोना संसर्गाच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये 331 रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, आता हा रेकॉर्डही मोडीत निघाला असून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1612 वर पोहोचली आहे. 


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Coronavirus Update : देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ? दिल्लीत 496, तर मुंबईत 1377 दैनंदिन कोरोना रुग्ण


Coronavirus Update : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid-19 Update) वाढताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशातील मंदावलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉनबाधितांच्या (Omicron) संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. देशभरातील  21 राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 650 हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद महाराष्ट्र आणि दिल्लीत झाली आहे.  


देशाच्या राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव 


दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 496 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक महिन्यांनी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं. तसेच कोरोना संसर्गाच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये 331 रुग्णांची नोंद झाली होती. परंतु, आता हा रेकॉर्डही मोडीत निघाला असून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1612 वर पोहोचली आहे. 



दिल्लीत कोरोना 'आउट ऑफ कंट्रोल'


झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या राजधानीमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे दिल्लीमध्ये रात्री दहा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सिनेमा हॉल, बँक्वेट हॉल, स्पा बंद करण्यात आले आहेत. रेस्टॉरंटही 50 टक्के उपस्थितीसह सुरु आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, दिल्लीतील कोरोना स्थितीवर लक्ष असून बदलणारी स्थितीचा आढावा घेऊन निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या तरी राजधानीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. चिंतेची बाब म्हणजे, सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाबद्दल अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले...


Ajit Pawar : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अधिवेशन काळात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडे सोपवायवला हवी होती, असेही विरोधकांनी म्हटले होते. विरोधकांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये असे अजित पवार यांनी म्हटले. 


विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, या अधिवेशानात तीन विधेयके मागे घेण्यात आली आहेत. अधिवेशनाचे कामकाज व्यवस्थित पार पाडले असून शक्ती विधेयकालाही या अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे. इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी 435 कोटी मंजूर करण्यात आल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. 


विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ठरलेल्या निधीपेक्षा अधिक निधी सरकारने दिला आहे. विदर्भाला 3 टक्के अधिक रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.