Maharashtra Breaking News LIVE Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
MHADA Exam: म्हाडाची आज होणारी परीक्षा पुढे ढकलली, मंत्री जितेंद्र आव्हाडांचं मध्यरात्री ट्वीट, विद्यार्थ्यांचा संताप
MHADA Exam Latest Update : जे विद्यार्थी म्हाडाच्या विविध पदांच्या परीक्षेसाठी निघाले असतील किंवा निघणार असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलंय
'सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो'
आव्हाड यांच्या या ट्विटनंतर त्यावर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. बंद असताना विद्यार्थी आधीच शेकडो रुपये खर्चून नियोजन करून बसले होते. सरकारने प्रत्येक परीक्षार्थीच्या खात्यात नुकसानभरपाई म्हणून 2000 रु. जमा करावेत, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे. आरोग्य विभागमध्ये पण तेच म्हाडामध्ये पण तेच. सरकारचा नियोजन शून्य कारभार आहे, असं एका विद्यार्थ्यानं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा
PM Modi Twitter account Hack : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याचे समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटवरून बिटकॉइनबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवर लक्ष्य करण्यात आले. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावरून काही ट्वीट करण्यात आले. यामध्ये बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाउंट 12 डिसेंबर रोजी सकाळी दोन वाजण्याच्या सुमारास हॅक करण्यात आले होते.
नांदेड जिल्ह्यातील पहिली ते सातवीच्या शाळा उद्या सुरू होणार
खासदार सांस्कृतिक महोत्सव यंदा 17 ते 26 डिसेंबरदरम्यान होणार
नागपूरसह संपूर्ण विदर्भाचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव यंदा 17 ते 26 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे... बॉलीवूड स्टार संजय दत्त यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे... स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या मध्यवर्ती संकल्पनेवर यंदा खासदार सांस्कृतिक महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे... देशातील आघाडीचे कलाकार यांना नागपुरातील खासदार महोत्सवात आपली कला सादर करणार असून नागपूरकरांना 17 ते 26 डिसेंबर दरम्यान संगीत, नाट्य यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी राहणार आहे....
तुळजापूर एसटीवर अज्ञात व्यक्तीने केली दगडफेक
तुळजापूर एसटीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. दगडफेकीत चालक रामदास इंगळे जखमी झाले आहेत. सोलापूर जवळील तळेहीप्परगा येथे ही घटना घडली आहे. चालकावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एम एच 20 पी एल 4114 क्रमांकाच्या एसटी बस मधून साधारण चाळीस प्रवासी तुळजापूरहून सोलापूरसाठी प्रवास करत होते.
प्रेमी युगूलातील मुलाला जमावाकडून अमानुष मारहाण
प्रेमी युगूलातील मुलाला जमावाकडून अमानुष मारहाण. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातल्या गायगाव ऑईल डेपोसमोरील घटना. मुलीने बुरखा घातला म्हणून तिच्या प्रियकराला मारहाण. प्रियकराला मारू नका म्हणत मुलीचा टाहो. रस्त्यावरच मुलीने घातलेला बुरखा उतरवायला लावला. मारहाण करणा-या दोन युवकांना उरळ पोलीसांकडून अटक, गुन्हे दाखल. मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिलेत कारवाईचे आदेश.
राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रविवारी संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले असून ते दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी उंटवाडी परिसरात मनसेच्या जनहित कक्ष व विधी विभाग कार्यालयाचे ते उदघाटन करणार असून या ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय.