Maharashtra Breaking News 5 August 2022 : मुंबईतील वाडिया रुग्णालयाला आग, अग्निशमनच्या आठ गाड्या ठिकाणी, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावरून काँग्रेस नेते खासदार कुमार केतकर यांनी भाजपर टीका केलीय. गांधी कुटुंबासोबत हा प्रकार पहिल्यांदा नाही, इंदिरा गांधींनासुद्धा अशीच वागणूक दिली होती, असा हल्लाबोल कुमार केतकर यांनी केलाय. गांधी कुटुंबाला नेस्तनाबूत केल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही हे भाजपला माहिती आहे. त्यामुळे हे सगळं चालू आहे. अमित शाह यांचा गांधी कुटुंबावर राग आहे.
शिंदे गटाने मुंबईत राष्ट्रवादीला धक्का दिलाय. मुंबईतील मालाड वार्ड क्र. 42 च्या माजी नगरसेविका धनश्री भराडकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
मुंबईतील वाडिया रुग्णालयाला आग लागली आहे. हे रुग्णालय लहान मुलांचे आहे. पण ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ते ऑपरेशन थिएटर बंद असल्याची माहिती आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून या ठिकाणी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या उपस्थित आहेत.
उपमुख्यमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री यांचाही दिल्ली दौरा. उद्यापासून करणार दोन दिवसीय दिल्ली दौरा असेल.
उपमुख्यमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री यांचाही दिल्ली दौरा. उद्यापासून करणार दोन दिवसीय दिल्ली दौरा असेल.
शिंदे गटाच्या खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. राष्ट्रपतींना शिंदे गटाच्या खासदारांकडून महाराष्ट्र भेटीचं आमंत्रण देण्यात आले आहे.
शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात विशेष कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात येण्याची राष्ट्रपतींना विनंती
या वर्षभरात माणगाव परिषदेच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतू, त्यावेळी महाराष्ट्राला भेट द्यावी ही विनंती.
अमरावतीः नागपूर-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर चौफुली समोर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की परिसरात मोठ्याने आवाज आला. दोन्ही ट्रकमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दोन्ही ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरात महामार्गावरील खड्डा वाचवताना अपघात झाल्याचं बोलल्या जात आहे. या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. नंतर पोलिस प्रशासनाच्यामदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Mumbai Bank : मुंबई बँक अध्यक्षपदी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड, राज्यातील सत्तांतरानंतर बँकेतही सत्तांतर
बार्शी तालुक्यात दोन्ही ग्रामपंचायतीवर राऊत गटाचा झेंडा फडकला आहे. पानगाव ग्रामपंचायतिमध्ये राऊत गटाचे 11 तर सोपल गटाचे 4 सदस्य विजयी झाले आहेत. तर वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीत सातही जागांवर राऊत गटाचा विजय झाला आहे. बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा गटाचा विजय झाला आहे. तर माजी आमदार दिलीप सोपल यांच्या गटाचा पराभव झाला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुख यांना दुसरा धक्का बसला आहे. 6 पैकी केवळ 1 एक जागा देशमुख यांच्या गटाला मिळाली आहे. तर स्थानिक आघाडीचे 6 सदस्य उमेदवार विजयी झाले आहे.
सोलापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा पहिला निकाल हाती आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटानं पहिले खातं उघडलं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत. भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे. माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता आली आहे.
Palghar News : पालघर - शिंदे सरकारचा उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांची नियुक्ती रद्द . शिवसेनेच्या पदाधिकारी ज्योती ठाकरे यांना ठाकरे सरकारकडून महिला आर्थिक विकास महामंडळाची देण्यात आली होती जबाबदारी . ज्योती ठाकरे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ महिला शिवसैनिक . महाराष्ट्र शासनाकडून ज्योती ठाकरे यांची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश .
Solapur Gram Panchayat Election Counting : सोलापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिले खाते उघडले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत. भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे. माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.
रायपूरः ईडीच्या नागपूर आणि दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून रायपूर येथील सराफा व्यावसायिकाकडे छापा मारण्यात आला आहे. ईडीच्या टीमसोबत शस्त्र जवानांची तुकडी असल्याची माहिती आहे. या सराफा व्यावसायिकाकडे यापूर्वीही गेल्यावर्षी धाड मारण्यात आल्याची माहिती. हवाला व्यवसायातील सराफा, कापड व्यापारी आणि संबंधीत सीएकडे ही धाड असल्याचे सूत्रांनी सांगितले. दररोज मोठे व्यव्हार होत असल्याची टीप ईडीच्या अधिकाऱ्यांकडे होती.
Gondia News : गोंदिया शहरात महिलांसाठी असलेल्या प्रसिद्ध बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालयातील प्रसुती कक्षाजवळच मोकाट डुकरांचा वावर असल्याने नवजात बालकांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे हे रुग्णालयच महिलांसह नवजात शिशूंच्या जीवावर उठलंय का असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
नागपूरः ईडी दिल्लीतील 30 अधिकारी नागपुरात दाखल झाल्याची सूत्रांची माहिती. मोठ्या कारवाईसाठी दाखल झाल्याचा अंदाज.
Buldhana News : मलकापूर तालुक्यातील आव्हा येथील देशी दारू दुकान बंद करण्यात यावं यासाठी काल अस्तित्व संघटनेच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी रास्तारोको केला होता. या गावातील देशी दारु दुकान हे भरवस्तीत असून दुकान चालक हा गावातील नागरिकांना दमदाटी, मारहाण करतो तर दारुडे महिलांची छेड काढतात. यामुळे हे देशी दारु दुकान बंद करण्यात यावं या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्या होत्या. जवळपास पाच तास रास्तारोको केल्यावर प्रशासनाने हे दारु दुकान सील केलं. यामुळे आक्रमक महिलांच्या आंदोलनाला हे मोठं यश आल्याचं बघायला मिळत आहे.
अमरावती शहरातील दरोगा प्लॉटमध्ये रात्री जुन्या वादातून एकाची हत्या... सचिन म्हैसकर (वय 35) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे..
6 ते 7 जणांनी सचिन म्हैसकर याच्यावर चाकूने वार करून घटनास्थळावरून पसार झाले..
राजापेठ पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेताय...
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ABP Majha Top 10, 4 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : पिझ्झाप्रेमी तुम्हीही असाल, पण हा पिझ्झा तुम्ही कधी खाल्ला आहे का? व्हिडीओ एकदा पाहाच
Watermelon Pizza Viral Video : सोशल मीडियावर काही खाद्यपदार्थ असे असतात जे पाहून खाद्यप्रेमींचाही संताप होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More
1965 india pakistan war : काश्मीर बळकावण्यासाठी 33 हजार पाकड्यांची घुसखोरी, भारताने 15 दिवसांत पलटवली बाजी, 1965 च्या युद्धात काय झालं?
1965 india pakistan war : भारताने कारगिल ताब्यात घेतले आणि 15 दिवसात पाकिस्तानचे ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले व काश्मीर जिंकण्याच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. Read More
China Taiwan Tension : चीनची चिथावणीखोर कारवाई, तैवानजवळ दोन तासांत 11 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली
China Taiwan Tension : चीनने तैवानच्या ईशान्य आणि नैऋत्य भागात अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे चीनकडून तैवानच्या सागरी हद्दीत डागण्यात आली आहेत. Read More
After Operation London Cafe : अभिनेत्री मेघा शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' मध्ये साकारणार प्रमुख भूमिका
मेघा शेट्टी (Megha Shetty) ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. Read More
Neel Salekar : 'सोशल मीडिया स्टार' नील सालेकरकडून चाहत्यांना खास गिफ्ट; 'जिंकलो' गाणं रिलीज
नील सालेकर (Neel Salekar) उर्फ जस्ट नील थिंग्सने गली गँगच्या डी'इव्हिल आणि कांचनसोबत 'जिंकलो' हे गाणं रिलीज केले आहे. Read More
CWG 2022: पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरनं सुवर्णपदक जिकलं, भारताची पदकसंख्या वीसवर
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरनं दमदार कामगिरीच्या जोरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकलंय. Read More
Shreeshankar Murli: त्यानं ठरवलंच होतं, भारतासाठी पदक जिंकायचंच! लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकरनं रौप्यपदक पटकावलं
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ लॉन्ग जंप इव्हेंटच्या अंतिम सामन्यात भारताचा लांब उडीपटू एम श्रीशंकरनं रौप्यपदक जिंकून बर्मिंगहॅममध्ये तिरंगा फडकावलाय. Read More
5th August 2022 Important Events : 5 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
5th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 5 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Crud Oil : युक्रेनच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या, प्रति बॅरल 90 डॉलरच्याही खाली
U.S. oil prices fall : जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या चिंतेमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. Read More
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -