Crude Oil : युक्रेनच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या, प्रति बॅरल 90 डॉलरच्याही खाली
U.S. oil prices fall : जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या स्थितीमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
U.S. oil prices fall : युक्रेनमधील (Ukraine War) युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच यूएस ऑइल (US Oil) फ्युचर्स प्रति बॅरल $ 90 च्या खाली घसरल्याने गुरुवारी तेलाच्या किमतीत घसरण सुरूच राहिली, यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदावलेल्या स्थितीमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
अमेरीका आणि युरोपात संभाव्य आर्थिक मंदी
जागतिक मंदीच्या संभाव्य पार्श्वभूमीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत. युक्रेन-रशिया युद्धाआधी असलेल्या किंमतींच्या निच्चांकी पातळीवर पोहचल्या आहेत. ब्रेंट क्रूड 21 फेब्रुवारी रोजी असलेल्या पातळीवर पोहोचले असून आज ब्रेंट क्रूड 93 प्रति बॅरलवर आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूड देखील 90 डॉलरच्या खाली आले असून 88 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. अमेरीका आणि युरोपातील संभाव्य आर्थिक मंदी, जगातील अर्थव्यवस्थांवरील बाजारांवर कर्जाचा डोंगर आणि जगातील सर्वात मोठा तेल आयातदार चीनकडून मागील सहा महिन्यात कोव्हिडसंदर्भात आखलेल्या कठोर धोरणांमुळे मागणीवर परिणाम होताना दिसत आहे.
मंदीचे संकेत, गुंतवणूकदार चिंतेत
बॅंक ऑफ इंग्लडकडून व्याजदर वाढवताना मंदीचे संकेत दिले आहेत, त्यामुळे इंधनाच्या मागणीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.