एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : पचमढी येथे दर्शनाला जाताना भाविकांच्या कारला भीषण अपघात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : पचमढी येथे दर्शनाला जाताना भाविकांच्या कारला भीषण अपघात

Background

देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

1.किव्हमध्ये रस्त्यावर दिसल्यास गोळी घालण्याचे आदेश, युक्रेननंतर फिनलँड आणि स्वीडनला रशियाचा इशारा, चेर्नोबिलनंतर आणखी एक अणुप्रकल्प ताब्यात घेण्याचा प्रयत्न

2. अमेरिकेची युक्रेनला 350 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत, जर्मनी 1 हजार अँटी टँक , 500 स्टिंगर क्षेपणास्त्रे पुरवणार, फोनवरुन झालेल्या चर्चेत झेलेन्सीकींची मोदींकडे राजकीय मदतीची मागणी

3. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन दोन विमानं मायदेशी परतले, 450हून अधिक विद्यार्थ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास, मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई

4.  नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडेंचे बेकायदेशीररित्या फोन टॅप केल्याचा आरोप, आयपीएस रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल, महाविकास आघाडीचा फडणवीसांवर हल्लाबोल

5. राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,  ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न 

OBC Reservation : राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समुदायाच्या आरक्षणाबाबत आज महत्त्वाचे निर्देश सुप्रीम कोर्ट देण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 

मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम रिपोर्टनुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने मागितली आहे. ओबीसी आरक्षण प्रकरणात येत्या 28 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचे उत्तर याच सुनावणीवर अवलंबून आहे.

राज्य मागासवर्गाच्या अहवालात काय?

राज्य सरकारनं ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सहा विभागाचा मिळून एकत्रित डेटा जमा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांचे म्हणजे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक सांख्यिकी राज्य सरकारने तयार ठेवली आहे. राज्य सरकारच्या विविध संस्था आणि शासकीय प्रणालीद्वारे काढलेल्या माहितीनुसार राज्यात ओबीसी समाज 40 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण 30 टक्के तर ओबीसी शेतकऱ्यांचे प्रमाण 39 टक्के असल्याचे सूचवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या डेटाला अर्जाला दिल्यास आगामी काळात होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होऊ शकते

6. 'मला कुणाला दोषी धरायचं नाही; समाजाला न्याय मिळावा हीच इच्छा'; संभाजीराजे छत्रपतींच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस

7. रविवारी राज्यात 782 नव्या रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू;  मुंबईकरांनाही दिलासा, कोरोना रुग्णवाढीच्या दरात घट

8.देशातील दहा सर्वात प्रदूषित नद्यांमध्ये कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा समावेश, पंचगंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

9.मणिपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान, 38 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात

10 . भारताकडून धर्मशालाच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात श्रीलंकेचा सात विकेट्सनी धुव्वा, रविंद्र जाडेजा, श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीनं मालिका खिशात

22:57 PM (IST)  •  28 Feb 2022

Nanded News: युक्रेनमधून नांदेडचे 3 विद्यार्थी परतले

रशियाच्या लष्करी आक्रमणामुळे युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या नांदेड च्या 30 विद्यार्थ्यां पैकी 3 विद्यार्थी आज सुखरूप शहरात परतले. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना कुटुंबीयांनी पाहताच सगळ्यांचे डोळे आनंदाश्रूनी डबडबले, परतलेल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बांधकाम मंत्री अशोक चव्हानांनी विमानतळावर हजेरी लावली
22:38 PM (IST)  •  28 Feb 2022

Accident :  पचमढी येथे दर्शनाला जाताना भाविकांच्या कारला भीषण अपघात

Accident :  मध्यप्रदेशातील पंचमढी येथे भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी जाताना कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे.  तुषार ज्ञानेश्वरराव झामडे  (30 वर्ष),  दीपक भाऊरावजी डाखोरे (वय 30), अक्षय गौरखेडे (वय 26 )  यांचा अपघाताता मृत्यू झाला आहे. 

16:55 PM (IST)  •  28 Feb 2022

Amravati News : अमरावती पालिका आयुक्त शाईफेक प्रकरणी चारही आरोपींना जामीन मंजूर

Amravati News : अमरावती पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर 9 फेब्रुवारी रोजी शाईफेक झाली होती. यावेळी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. दरम्यान 19 दिवसांनंतर चार आरोपींना जामीन मिळाला आहे. तर एक आरोपीला चार दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. अजय बोबडे, संदीप गुल्हाने, सुरज मिश्रा, महेश मुलचंदानी या चारही आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायाधीश एस बी जोशी यांनी जामीन दिला आहे. 

16:37 PM (IST)  •  28 Feb 2022

Mumbai News :  मंत्रालयात एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न

Mumbai News :   मंत्रालयात एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या दुस-या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र मंत्रालयातील कर्मचारी यांनी या महिलेला अडवले. 
एसआरए घराची फसवणूक झाली म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही महिला टिटवाळा या ठिकाणी राहायला आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

16:19 PM (IST)  •  28 Feb 2022

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती झाली आहे. तर हेमंत नगराळे यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ पदी नियुक्ती झाली आहे

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या व्यक्तींना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलंNitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात NagpurBhaskar Jadhav on Eknath Shinde : शिंदेंचा सवाल, भास्कर जाधव म्हणाले... नक्कल करायला अक्कल लागतेABP Majha Headlines : 11 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत
Viral Video : इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
इंग्लिश बोलताना सगळं भूर्रर्रर्र.... पाकिस्तानी कॅप्टनची दांडी गुल; भाऊ काय बोलला कोणाला कळलच नाय! व्हिडीओ पाहाच
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Rahul Gandhi: 'एक है तो सेफ है'च्या मागे मोदी-अदानींचा फोटो, महाराष्ट्राची तिजोरी दाखवली, शेवटच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मिसाईल सोडलं
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मिसाईल सोडलं, मोदी-अदानींचा फोटो दाखवत रान उठवलं
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Embed widget