Maharashtra Breaking News 27 July 2022 : वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
27th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 27 जुलै 1761 साली माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले. तसेच याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन सुद्धा आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 27 जुलैचे दिनविशेष.
27 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. 2003 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
1761 : माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले.
मराठेशाहीतील चौथा कर्तबगार पेशवा. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब आणि गोपिकाबाई यांचा दुसरा मुलगा. त्याचा जन्म सावनूर (धारवाड जिल्हा) येथे झाला. माधवराव पेशव्याने मराठ्यांची दक्षिणेतील सत्ता भक्कम केली. माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली यांचा बंदोबस्त केला. माधवरावांनी उत्तरे मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव आणि त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम आणि मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी आणि प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो.
1949 : पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
2001 : सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
1921 : रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.
Nagpur Crime : रेनकोट घालण्यासाठी थांबला, पाठीमागून येऊन दोघांनी 20 लाख पळवले
नागपूरः शहरातील मिरची व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याकडून चिखली फ्लायओव्हरवर बाईकवर येणाऱ्या दोघांनी 20 लाखांची रोकड पळविली. सिद्धार्थ रामटेके नावाचा मिरची व्यापाऱ्याचा कर्मचारी कळमना बाजारपेठेतून एका व्यापाऱ्याकडून वीस लाख रुपयांची रोकड घेऊन आपल्या मालकाच्या घरी जात होता. तो पाऊस येत असल्यामुळे थांबला. त्याच वेळेस पाठीमागून आलेल्या दोन लुटारुंनी सिद्धार्थला मारहाण करत त्याच्याकडील रोकड पळविली. ही घटना यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत चिखली फ्लायओव्हर घडली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Solapur: सोलापूरमध्ये 10 ते 12 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा
सोलापूरमध्ये 10 ते 12 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची बातमी समोर येत आहे. सिध्देश्वर वूमन पॉलिटेक्निक महाविद्यालयच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींना ही विषबाधा झाली आहे. काल रात्रीच्या जेवणामुळे आज सकाळपासून जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरु झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज काही महत्त्वाच्या बैठका असल्यामुळे ते दिल्लीला जाणार नाहीत. त्याऐवजी ते उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता.
सोलापूरमध्ये 10 ते 12 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा
सोलापूरमध्ये 10 ते 12 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. सिध्देश्वर वूमन पॉलिटेक्निक महाविद्यालयच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनी विषबाधा झाली. काल रात्रीच्या जेवणामुळे आज सकाळपासून जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरु झाल्याची माहिती.
Nagpur Covid Update : बुधवारी चौथ्या लाटेतील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद, दिवसभरात 291 बाधित
नागपूरः जिल्ह्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण म्हणजचे तब्बल 291 नव्या कोरोना बाधितांची नोंद बुधवारी प्राप्त अहवालानुसार करण्यात आली. बाधितांपैकी 108 ग्रामीणमधील तर 183 बाधित शहरातील आहेत. सध्या जिल्ह्यात 1644 कोरोना बाधित सक्रिय आहेत.