Maharashtra Breaking News LIVE Updates: अलिबाग येथील पावणे तीनशे एसटी कर्मचाऱ्यांची स्वेच्छा मरणाची मागणी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
१. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण,१० जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठांना बुस्टर डोस, पंतप्रधान मोदींचं जनतेला न्यू इयर गिफ्ट
PM Narendra Modi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणासह (Vaccination) बूस्टर डोस संबधी देखील माहिती दिली. तसंच सध्या सुरु असलेल्या सणांच्या काळातही काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
नेमक्या तीन घोषणा काय?
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.
अजूनही काळजी घेणं महत्त्वाचं
कोरोनाच्या संकटाबाबत बोलताना पंतप्रधानांनी भारत या संकटाचा सामना मोठ्या शिताफीने करत असल्याचं सांगतिलं. आतापर्यंत 141 कोटी जनतेचं लसीकरण झालं असून आपली अर्थव्यवस्थाही उस्ताहजनक आहे. दरम्यान लसीकरण कोरोनाविरुद्ध एक मोठं शस्त्र असल्याचंही ते म्हणाले. तसंच ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, कोरोना अजूनही गेला नसल्याने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
२. लहान मुलांसाठी पहिल्या स्वदेशी लशीला हिरवा कंदील, १२ ते १८ वयोगटातील मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस मिळणार
३. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस हायकमांड कुणाला कौल देणार याची उत्सुकता शिगेला, संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण आणि के. सी. पाडवींच्या नावाची चर्चा
४. सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंतच शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन मिळणार, काकड आणि शेजारतीसाठी भक्तांना प्रवेश नाही, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानं निर्बंध
५. राज्यातील थंडी कमी होणार... खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, तर २८ आणि २९ डिसेंबरला मराठवाड्यातील काही भागात पावसाचाही अंदाज
६. आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात, वाद विसरुन आफ्रिकन सफारी फत्ते करण्याचा विराटसेनेचा निर्धार, टीम सिलेक्शनचा गुंता सोडवण्याचं आव्हान
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील 3 वर्षीय बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कुऱ्हा येथील मानवी चोले या 3 वर्षीय मुलीचा मृतदेह तेथील एका टाकीत आढळून आला आहे. ती 20 डिसेंबरपासून गावातून बेपत्ता झाली होती.
अलिबाग येथील पावणे तीनशे एसटी कर्मचाऱ्यांची स्वेच्छा मरणाची मागणी
अलिबाग येथील एसटी कर्मचाऱ्यांची स्वेच्छा मरणाची मागणी केलीय. अलिबाग एसटी आगारातील पावणे तीनशे कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडं निवेदनाद्वारे स्वेच्छा मरणाची मागणी केलीय. शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं एसटी कर्मचऱ्यांनं हा निर्णय घेतलाय.
एकशे आठ वर्षे उत्तमराव मास्ट यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा डोस
कोरोना लसीकरण मोहीम देशभरात राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. परंतु, नागरिक याला प्रतिसाद देताना दिसून येत नाहीत. अशातच हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील रहिवासी असलेल्या एकशे आठ वर्षे वय असलेले उत्तमराव मास्ट यांनी आज कोरोना लसीकरनाचा पहिला डोस घेतला आहे. शिरडशहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील विभागाच्या वतीने प्रत्येक घरी जाऊन कोरोना लसीकरण मोहीम राबवत आहे त्याच माध्यमातून उत्तमराव मास्ट यांना लस देण्यात आली आहे. लस देण्यासाठी अनेक जण कुचराई करत आहेत परंतु त्या सर्वांसाठी आदर्श ठरलेत हे उत्तमराव यांचा लस घेतानाचा फोटो केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया ट्विट केला आहे.
एकशे आठ वर्षे उत्तमराव मास्ट यांनी घेतला कोरोना लसीकरणाचा डोस
कोरोना लसीकरण मोहीम देशभरात राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. परंतु नागरिक लसीकरणाला प्रतिसाद देताना दिसून येत नाहीत. अशातच हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील रहिवासी असलेल्या एकशे आठ वर्षे वय असलेले उत्तमराव मास्ट यांनी आज कोरोना लसीकरनाचा पहिला डोस घेतला आहे.
अकोल्यात आढळला ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण
दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’च्या निदानासाठी रुग्णाचे ‘आरएनए’ सॅम्पल पुण्याला पाठविण्यात आले होते.