Maharashtra Breaking News LIVE Updates: कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
1.ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध,थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी नाकारली
Maharashtra Corona Omicron Update new guidelines : राज्यात ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. या जमावबंदीच्या दरम्यान राज्यात सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध आणण्यात येणार आहेत.
संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळा- मुख्यमंत्री
विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील 110 देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.
2. मुंबईत नाताळ आणि थर्टी फर्स्टसाठी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्याची मनाई, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे आदेश
3. कोरोनाच्या सावटाखाली देशभरात नाताळचं सेलिब्रेशन, जगभरातल्या चर्चवर रोषणाई, नाताळासाठी सरकारची नियमावली
4. एसटीच्या विलिनीकरणाचं डोक्यातून काढून टाका, विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, एसटी कर्मचारी कोणतं पाऊल उचलणार याकडे लक्ष
5. फोन टॅपिंग अहवाल कसा लिक झाला याबाबत देवेंद्र फडणवीसच माहिती देऊ शकतात, राज्य सरकारचा मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात दावा
6. कोरेगाव-भीमा चौकशी आयोगास आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ; राज्य सरकारची परवानगी
7. फुकट दारू आणि जेवणासाठी मुंबईतील एपीआय विक्रम पाटलांची बार मॅनेजरला मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, वरिष्ठांकडून चौकशीचे आदेश
8. हवाई दलाच्या मिग-21 विमानाचा जैसेलमेरजवळ अपघात, पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हांचा मृत्यू
9. आदित्य ठाकरेंवरील आक्षेपार्ह वक्तव्य नितेश राणेंना भोवण्याची शक्यता, शिवसेनेकडून निलंबनाची मागणी
10. राज्यात कोरोना रुग्णांमध्येही सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ, शुक्रवारी 1410 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 23 नवे ओमायक्रॉनबाधित
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणतात.
आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. 10 जानेवारीपासून याची सुरुवात होणार आहे. तसंच 60 वर्षावरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.
15 ते 18 वर्षांतील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु करणार
सोमवारी 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षांतील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु कऱणार असल्याची मोठी घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
PM Modi Live : कोरोना अजूनही गेलेला नाही!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं आहे, भारत कोरोनाविरुद्धच्या लढाईत कामगिरी करत आहे. आतापर्यंत 141 कोटी जनतेचं लसीकरण झालेलं आहे, भारताची आर्थिक स्थितीही उत्साहजनक आहे. पण कोरोना अजूनही गेलेला नसल्याने काळजी महत्त्वाचं आहे.
PM Modi Live : ओमायक्रॉनविरुद्ध काळजी घेणं गरजेचं
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी यावेळी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.