Maharashtra Breaking News 23 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jul 2022 11:18 PM
Maharashtra News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात, 13 जखमी

Maharashtra News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अच्छाड येथे भीषण अपघात घडला आहेइको कारला फॉर्च्युनर कारने धडक दिल्याने 13 जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला सेलवास येथील  विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये आले हलविण्यात . तर काही जखमींना तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले, कंपनीतून कामगार महिला घरी परतत असताना झाला इको कारला अपघात  झाला आहे.



सरकार दीड महीन्यांच्या वर टिकणार नाही.. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचे भाकीत

सरकार दीड महीन्यांच्या वर टिकणार नाही.. राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांचे भाकीत.. जर मध्यावर्ती निवडणुका जर लागल्या राष्ट्रवादी महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष असेल.. अमोल मिटकरी हे बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार याच्या वाढदिवसा निम्मीत कार्यक्रमात बोलत होते..

गडचिरोली:- पर्लाकोटा नदीला पूर आलापल्ली भामरागड मार्ग परत बंद 

गडचिरोली:- भामरागडच्या पर्लाकोटा नदीला पूर आलापल्ली भामरागड मार्ग परत बंद करण्यात आलाय. काही दिवसांच्या विश्रांती नंतर जिल्हा सह शेजारच्या राज्य छत्तीसगढ मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मनसे नेते अमित ठाकरे व आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना ,काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मनसे नेते अमित ठाकरे आज कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या त्यानंतर मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. डोंबिवली पूर्व येथील सर्वेश हॉल मध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान मनसे नेते अमित ठाकरे , आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना ,काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला . यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. 

सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकारी शिवसेनेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला . 
सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे , पर्यावरण विभाग प्रदेश सचिव सच्चीदानंद बुगडे , एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे , तसेच विभागीय सचिव संदीप कोठावळे , किरण गावडे , वैभव सुतार , अवी गावंड आदी पदाधिकाऱ्यांनी  याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

  नायगांव बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबियांना 48 तासांत घरं खाली करण्याची नोटीस 

नायगांव बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबियांना 48 तासांत घरं खाली करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या आहेत. कोणताही करार किंवा किंमत न ठरवताच घरं खाली करण्यासाठी म्हाडाकडून पोलिसांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलीस कुटुंबियांमध्ये म्हाडाबद्दल प्रचंड नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. आधी करार करा, मगच घरं खाली करण्यावर पोलीस कुटुंबिय ठाम आहे. 

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने 208 हेक्टरमधील पिकांचे नुकसान, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू

गोंदिया जिल्ह्यात मागील बारा दिवसापासून पावसाची जोरदार बँटींग सुरू असून जुलै महीन्यात अतिवृष्टी झाल्याने सरासरीपेक्सा जास्त पावसाची नोंद झाली आहे. याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  मोठ्या प्रमाणात बसला असून  गोंदिया जिल्ह्यातील  तब्बल 208  हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे तर कृषी विभागाने त्वरीत पंचनामे करून ? शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. तर याचा फटका गोंदिया जिल्याच्या सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात बसला आहे. 

BDD Chawl :  नायगांव बीडीडी चाळीतल्या पोलीस कुटुंबियांना 48  तासांत घरं खाली करण्याची नोटीस

BDD Chawl :  नायगांव बीडीडी चाळीतल्या पोलीस कुटुंबियांना 48  तासांत घरं खाली करण्याची नोटीस  देण्यात आली आहे. कोणताही करार व किंमत न ठरवताच घरं खाली करण्यासाठी म्हाडाने पोलीस परिवाराला नोटीस दिली आहे. पोलीस कुटुंबियांमध्ये म्हाडाबद्दल प्रचंड नाराजीचं वातावरण  आहे. आधी करार मगच घरं खाली करण्यावर पोलीस ठाम आहेत.



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा दौरा करणार, मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिलाच महाराष्ट्र दौरा

CM Eknath Shinde Maharashtra Visit : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असेल. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही महाराष्ट्र दौरा करुन सर्व परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

उद्धव ठाकरेंची सामनात मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी, संजय राऊतांनी ट्वीट करत दिली माहिती

उल्हासनगर शहरात 30 ते 35 गाड्यांची तोडफोड करुन टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरात सशस्त्र टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली. कॅम्प नंबर दोनच्या हनुमान नगर आणि रमाबाई आंबेडकर नगर या परिसरातील तब्बल 30 ते 35 रिक्षा आणि दुचाकींना लक्ष करत त्यांची तोडफोड करण्यात आली. तलवारी आणि लोखंडी रोडच्या माध्यमातून या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. मध्यरात्री उशिरा दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हनुमान नगर परिसरात प्रवेश केला. यावेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली प्रत्येक गाडी फोडत दहशत माजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इतकंच काय तर काही घरांचे पत्रे आणि खिडक्या देखील या टोळीने फोडल्या. या भागात काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले होते आणि त्याच रागातून दुसऱ्या गटाने या परिसरातील गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती मिळते आहे. ही घटना उल्हासनगर पोलिसांना कळतच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आतापर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. मात्र पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

सिंधुदुर्गात विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, दोडामार्गमधील मोर्ले गावातील घटना

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील मोर्ले गावातील महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. कपडे धुतल्यानंतर ते अंगणात वाळत टाकण्याच्या रॉडला विद्युत तारेचा स्पर्श होऊन त्याचा धक्का लागल्याने मोर्लेतील सौ. शुभांगी सुभाष सुतार यांचा मृत्यू झाला. त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल कारण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.

चिपळूण : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरुन शिवसेनेत वाद

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवरुन शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या चिपळूणच्या महापूरात मंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणवासियांना मदत केली होती. आज वर्षे पूर्ण होताच चिपळूणवासियांनी त्यांचे आभार मानणारे बॅनर शहरात लावले. पण ते बॅनर शिवसैनिकांनी रात्री फाडले. त्यानंतर आज पुन्हा नव्याने बॅनर लावण्यात आले. आज शिवसेना कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बॅनरबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.. 


 

यवतमाळ : सायबर कॅफे चालकाकडून विद्यार्थिनींची फसवणूक; नीट परीक्षेचे बनावट हॉल तिकीट दिल्याचा आरोप

यवतमाळमध्ये एका सायबर कॅफे चालकाने दोन विद्यार्थिनींना नीट परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरून दिले. मात्र विद्यार्थिनी परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर गेल्या असता हॉल तिकीट बनावट असल्याचे समजले. विद्यार्थिनींना पेपर न देताच परत यावं लागलं. फसवणूक लक्षात येतात विद्यार्थिनी यवतमाळ शहर पोलिसात धाव घेतली वृषाली संतोष गिरी व नंदिनी संदीप मोकळकर अशी फसवणूक झालेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे.

भंडारा : साखर कारखान्याच्या आतमध्ये मृतावस्थेत आढळला बिबटया

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बंद अवस्थेत असलेल्या साखर कारखान्याच्या आतमध्ये मृत अवस्थेत बिबट्या आढळला असून या बिबट्याचा साधारणत: चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने लावला आहे. रात्रीचा सुमारास या साखर कारखान्यातील चौकीदार गस्तीवर असतांना दुर्गंध आल्याने तपासणी दरम्यान कारखान्याचा शेडमध्ये मृत अवस्थतेत बिबट्या आढळला. सदर माहिती वन विभागाला देण्यात आली तर वन विभागाने मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून साखरकारखाना परिसरातच त्याला जाळण्यात आलं.





भंडारा : कडुलिंबाचे झाड कारवर कोसळून कार चालक डॉक्टर जखमी

विशाल कडुलिंबाचे झाड कारवर कोसळून कार चालक डॉक्टर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय समोरुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर घडली आहे. डॉ नरेंद्र श्रीपात वय 55 वर्ष बालरोग तज्ञ असे जखमी कारमालकाचे नाव आहे. झालेल्या अपघातात कार चा अक्षरक्षा चुराडा झाला आहे. जखमी डॉक्टरांवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. विशेष म्हणजे झाड़ रस्त्याच्या मधोमध पडल्याने राष्ट्रीय महामार्ग 6 वरील वाहतूक खोलंबली आहे. यामुळे 4 किलोमीटर पर्यत्न गाड्यांचा रांगा लागल्या आहे. झाड़ रस्त्यावर एनकेन प्रकारे हटवून रस्त्या वाहतुकी साठी सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहे.





उल्हासनगर : उघड्या विद्युतवाहिनीचा झटक्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

ल्हासनगर शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. तिसरीत शिकणाऱ्या विनोद परिवार या विद्यार्थ्यांचा विजेचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झालाय. कॅम्प नंबर चारच्या व्हीनस चौक परिसरात असलेल्या महापालिकेच्या फाउंटनमधील पाण्यात पोहायला विनोद उतरला होता. यावेळी बाहेर अल्यानंतर त्याला विद्युत खांबाचा जोरदार झटका बसला. यात विनोदचा जागीच मृत्यू झाला. तिथल्या स्थानिकांनी विनोदला विजेचा धक्का लागल्याचे पाहताच तात्काळ काठीच्या साहाय्याने त्याची तिथून सूटका केली आणि त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं. विजेच्या वाहिन्या मोकळ्या ठेवल्याने या विद्यार्थीचा बळी गेला, असा आरोप सध्या नागरिकांकडून केला जातोय. सध्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.





वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील अलमडोह-अल्लीपुर मार्ग बंद

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अलमडोह-अल्लीपूर मार्ग बंद आहे. यशोदा नदीला पूर आल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहतूक ठप्प झाली आहे.





अमरावती : वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरण, नाक आणि तोंड दाबल्याने मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड

अमरावती वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरणाती प्रथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. आदर्श कोगे (वय 13) या विद्यार्थ्याचा मृत्यू नाक आणि तोंड दाबल्याने झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीसांनी वसतिगृहाच्या गृहपालावर हत्येचा गुन्हा दाखल केला पण अजून कुणालाही अटक केलेली नाही. विद्यार्थ्यांमध्ये 20 तारखेला भांडण झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृत्यूचे अनेक कारणं असू शकतात त्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला कसा याचा बारकाईने शोध पोलीस घेताय. विद्याभारती वसतिगृहात CCTV आहे पण अनेक निकामी आहे. काही सुरू आहे. त्याचा ही बारकाईने तपास सुरू आहे.

सातारा : तालीम संघ येथे युवकाची हत्या

सातारा शहरातील तालीम संघ येथे युवकाची हत्या करून मृतदेह फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप दबडे असं मृत युवकाचं नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

सिंधुदुर्ग : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे  शिवसेनेच्या वाटेवर?

सिंधुदुर्ग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे  शिवसेनेच्या वाटेवर ?


दुपारी अडीचच्या दरम्यान घेणार उद्धव ठाकरे यांची भेट


गुरुवारी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर गावडे शुक्रवारी मुंबईच्या दिशेने रवाना


गावडे मुळचे सावंतवाडीचे असल्याने दीपक केसरकर यांच्या समोर आव्हान उभं करण्याचा शिवसेनेचा प्लॅन?

सिंधुदुर्गातील मालवणमधील चित्रकार समीर चांदरकर यांनी साकारली नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची रांगोळी

Sindhudurg : भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु याची निवड झाल्यानंतर देशभरातून त्याना शुभेच्छा देण्यात येत आहेत. देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपदी होण्याचा मान त्यांना मिळवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मालवण कट्टा या प्रशालेतील कलाशिक्षक तसेच चित्रकार समीर चांदरकर आणि प्रशालेतील विद्यार्थिनीनी मिळून नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची रांगोळी साकारली आहे. राष्ट्रपती निवड झाल्यानंतर समीर चांदरकर आणि विद्यार्थीनीनी रांगोळीच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

संदिपान भुमरे यांच्या फोटोवर शिवसैनिकांनी काळं फासलं

आदित्य ठाकरे ज्या रस्त्यावरून संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. त्याच रस्त्यावर इटखेडा परिसरात संदिपान भुमरे यांचा बॅनर आहे. त्या बॅनरवरील संदिपान भुमरे यांच्या फोटोवर शिवसैनिकांनी काळं फासलं

BJP Panvel Meeting : भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पनवेलमध्ये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार स्वागत

राज्यात सत्तांतरानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्तेवर आलेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पनवेलमध्ये होतेय. तर बंडामुळे सत्तेवरून पायउतार झालेल्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहेत. बंडखोरांच्या मतदारसंघातील शिवसंवाद यात्रा आज औरंगाबादच्या पैठणमधून सुरु झालीय. तिकडे पनवेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार स्वागत करण्यात येतंय. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदारसंघात फिरतायत...

Sanjay Raut Live : शिवसेना खासदार संजय राऊत लाईव्ह

Sanjay Raut Live : शिवसेना खासदार संजय राऊत लाईव्ह



 




भगतसिंह कोश्यारींकडून लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

आज लोकमान्य टिळक यांची जयंती आहे.यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मुंबईत मरीन ड्राईव्ह येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत एकाच रात्री अज्ञातांकडून 14 चारचाकी वाहनांची तोडफोड

Kolhapur News : कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. एकाच रात्री अज्ञातांनी 14 वाहनांची तोडफोड केली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Raigad News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खाजगी बसचा अपघात; चालकाचा मृत्यू

Raigad News : मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर खाजगी बसचा अपघात, चालकाचा मृत्यू


मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर बसचा अपघात, प्रवासी जखमी


कोननजीक खाजगी बसचा अपघात, चार प्रवासी गंभीर जखमी


कंटेनर ट्रेलरला बसची मागून धडक, 7 प्रवासी किरकोळ जखमी


जखमी प्रवाशांना एमजीएम पनवेल येथील रुग्णालयात दाखल

Market Committees : स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांचे रँकिंग जाहीर होणार

Market Committees : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांचे रँकिंग जाहीर होणार आहे. बाजार समित्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर होणार असल्याची माहिती राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Jayant Patil : जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात (Sangli Court) हजर न राहिल्याने त्यांना वारंट काढले होते. आमदार जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Coronavirus : चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरियंट

Coronavirus in Maharashtra : देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वेगानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातल्यात्यात दिलासादायक बाबा म्हणजे, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात (Maharashtra) ओमायक्रॉनचा (Omicron) सबव्हेरियंट बीए.5 (Sub Variant BA.5) ची लागण झाल्याले रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


23rd July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 23 जुलै याच दिवशी प्रसिद्ध भारतीय जहाल मतवादी नेते भारतीय राजकारणी, समाजसुधारक, भगवद्गीतेचे भाष्यकार आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते केशव गंगाधर टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 23 जुलैचे दिनविशेष.


1856 : भारतीय राजकारणी, समाजसुधारक, भगवद्गीतेचे भाष्यकार आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन.


लोकमान्य बाळ गंगाधर थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. बाळ गंगाधर टिळक केशव गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.


1856 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. 


1986 : जैव‍अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.


1999 : केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.


2016 : पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, कालिदास सन्मान पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एस. एच. रजा यांचा यांचे निधन.


1982 : साली ‘आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशन’ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर 1985-86 पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.


2012 : साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकार, भारतीय राष्ट्रीय लष्करा अधिकारी आणि आझाद हिंद सरकारमधील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.