Jayant Patil: जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट; काय आहे प्रकरण
जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे.
Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात (Sangli Court) हजर न राहिल्याने त्यांना वारंट काढले होते. आमदार जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आमदार जयंत पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मारला. मुंबई पोलिस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात आमदार जयंत पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील , शरद गायकवाड , मोहन गायकवाड , राजेंद्र भासर , विलासराव शिंदे , जितेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने आ.जयंत पाटील यांना वारंट काढले होते. काल दुपारच्या सुमारास आ.जयंत पाटील इस्लामपूर न्यायालयात हजर राहिले होते. जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली आहे.
वाळवा तालुक्यातील वाळवा व शिरगाव गावाला जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. विकासाच्यादृष्टीने हा पूल अत्यंत महत्वाचा आहे. कृष्णा नदीला पूर आला की शिरगावशी संपर्क तुटायचा मात्र या पुलामुळे तो प्रश्न कायमचा मिटला आहे. pic.twitter.com/RtabNsHOD8
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 21, 2022
इतर महत्वाच्या बातम्या
Coronavirus : चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळला ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरियंट; पुण्यात 2 रुग्णांची नोंद