(Source: Poll of Polls)
Maharashtra Breaking News 22 July 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली, मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण नाही: एकनाथ शिंदे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
22nd July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 22 जुलै याच दिवशी भारताचे जहाल मतवादी क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी देशाचे दुर्दैव या जहाल मतवादी अग्रलेखाचे लिखाण केल्याप्रकरणी टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली होती. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 22 जुलैचे दिनविशेष.
1923 : मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी 10,000 हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेलाअ ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती.
1925 : इंग्रजी-मराठीतले पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर यांचा जन्म.
गोविंद तळवलकर यांचं संपूर्ण नाव गोविंद श्रीपाद तळवलकर. हे इंग्रजी-मराठीतले पत्रकार आणि लेखक होते. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार, साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे बरेचसे लेखन पुस्तकरूपातही प्रकाशित झाले आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणारे आणि संतांप्रमाणे सामान्यांनाही समजेल अशी लेखनशैली जोपासणारे तळवलकर हे खऱ्या अर्थाने 'अग्रलेखांचे बादशहा' होते. भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते.
1908 : साली भारताचे जहाल मतवादी क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी देशाचे दुर्दैव या जहाल मतवादी अग्रलेखाचे लिखाण केल्याप्रकरणी टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली.
2003 : साली अमेरिकेच्या लष्करी सैन्याने इराकवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात इराक शासक सद्दाम हुसेन यांची मुले मारली गेली.
1965 : साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि आशा संस्थेचे एक संस्थापक आणि सदस्य संदीप पांडे यांचा जन्मदिन.
जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वारंट.. जयंत पाटलांनी हजर राहून वारंट रद्द करत केला जामीन मंजूर..
सातारा आणि सांगलीला नवे जिल्हाधिकारी
डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची देखील बदली झाली आहे. त्यांच्या जागी रुचेश जयवंशी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
Eknath Shinde : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली, मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण नाही: एकनाथ शिंदे
दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली असून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी कोणतीही अडचण नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही सूचना दिली नाही, मंत्रिमंडळाच्या विस्तारावर कोणताही निर्बंध लावण्यात आला नाही असंही ते म्हणाले. तसेच त्यावेळी नक्षल्यांच्या धमक्या येत होत्या, सुरक्षा देणं किंवा वाढवणं हे गृहखात्याचं काम, त्यावर मला काही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नाशिकच्या पेठसह त्र्यंबक तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के
नाशिकमधील पेठसह त्र्यंबक तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेल्या खरपडी, नाचलोंढी, धानपाडा तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा, खैराईपाली या गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
नाशिकपासून 40 किमी अंतरावर काल 2.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला होत. याच परिसरात आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तीन रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद नाशिक मेरी येथील भूकंप मापक यंत्रावर करण्यात आलेली आहे.
जि.प., पं.स. निवडणुकीचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत २८४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दि.आज दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि.२७ जून रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दि.१३ जुलै रोजीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया स्थगिती केली होती. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या सुधारित प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. आता जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकाऱ्यांनी तर पंचायत समिती स्तरावरील आरक्षणाची सोडत तहसीलदारांनी करावी. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांपेक्षा कमी नसलेल्या दर्जाचा अधिकारी नेमावा, अशा सूचना आहेत.