Maharashtra Breaking News Live Updates 18 September 2022 : नितीन गडकरी आणि माझे विचार भव्य-दिव्य, त्यामुळे आमचे विचार जुळतात: राज ठाकरे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
सिंहगडावरील हत्तीटाक्यात बुडून सहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
सिंहगडावरील हत्ती टाक्यात सहलीसाठी आलेला इयत्ता बारावीचा विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहिद मुल्ला असे विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकत होता.
Raj Thackeray : नितीन गडकरी आणि माझे विचार भव्य-दिव्य, त्यामुळे आमचे विचार जुळतात: राज ठाकरे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जे काही करतात ते 'वरुन'च करतात, माझे आणि नितीन गडकरींचे विचार जुळतात कारण आमचे विचार भव्य-दिव्य आहेत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज फुटाळा लेकवरच्या लेझर शोच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
Nitin Gadkari : फुटाळा तलावावर लोटस गार्डन बनवणार: नितीन गडकरी
नागपुरात फुटाळा तलावामध्ये लोटस गार्डन बनवणार असून त्यासाठी कमळाच्या साडेसहाशे जाती गोळा करणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
Nagpur : सिव्हिल लाइन परिसरात मनपाच्या 'आपली बस'ची दुचाकीला धडक
नागपूरः रविवारी ड्यूटीवर जात असलेल्या महिला कॉन्स्टेबलला नागपूर महानगरपालिकेच्या 'आपली बस'ने सिव्हिल लाइन परिसरातील बाटा शोरुम समोर धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर याच बसमधून महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. या संदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातही आयोग स्थापन करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यातही आयोग स्थापन करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक पार पडली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

